शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

राज्य पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेलाच नाही!

By admin | Published: July 08, 2015 2:29 AM

राज्यातील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. पोलीस आणि गुन्हेगारांची साखळी असल्यामुळेच गुन्हेगारांना जामीन मिळतो, अशा शब्दांत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृह खात्याला ‘घरचा’ अहेर दिला.

सांगली/कोल्हापूर : राज्यातील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. पोलीस आणि गुन्हेगारांची साखळी असल्यामुळेच गुन्हेगारांना जामीन मिळतो, अशा शब्दांत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खात्याला ‘घरचा’ अहेर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री पाटील यांनी पोलीस खात्यावर एकप्रकारे मुक्तचिंतनच केले. ते म्हणाले, की अनेकदा आंदोलनकर्ते पोलिसांवर तर गुन्हेगार हे पोलीस ठाण्यांवर हल्ले करतात. सुईच्या कामासाठी तलवारीचा वापर न करता बंदुकीचा धाक दाखवला पाहिजे, तरच पोलिसांचा वचक राहील. समाजातील गुन्हेगारी आणि माफियाराज यांचा वेळीच बंदोबस्त करा अन्यथा काही खैर नाही, असेही त्यांनी सुनावले.सहकार मंत्री चंद्रकांत दादा हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू गोटातील मंत्री म्हणून ओळखले जातात. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कोल्हापूर सासुरवाडी असल्याने दादांचे दिल्लीशी थेट संबंध आहेत. शहा यांच्या शिफारशीवरूनच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन सार्वजनिक बांधकाम आणि सहकार अशी वजनदार खातीही मिळाली. त्यामुळे मंत्रिमंडळात दादांचा शब्द प्रमाण मानला जातो. (प्रतिनिधी)ही तर कोल्हपूरची देन - पवारसहकारमंत्र्यांनी पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेबद्दल उलटसुलट विधाने केली असल्याचे कोल्हापुरात पत्रकारांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर मोठ्या उपहासात्मक शब्दांत पवार म्हणाले, की चंद्रकांतदादा ही तर कोल्हापूरने महाराष्ट्राला दिलेली मोठी देन आहे! त्यांच्यासारखा विविध प्रश्नांवर बेधडकपणे भूमिका मांडणारा मंत्री मी आजपर्यंत बघितला नाही. त्याबद्दल कोल्हापूरकरांचे आभारच मानायला पाहिजेत !शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर अग्निशमन यंत्राच्या खरेदीतील अनियमितेबाबत आरोप झाला, तेव्हा तावडेंची पाठराखण करण्यासाठी चंद्रकातदादा पुढे सरसावले होते. शिवाय शिवसेना आणि भाजपात समन्वयाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे दादांना ‘संकटमोचक’ म्हणूनच संबोधले जाते. असे असताना अचानक त्यांनी फडणवीस यांच्याकडील गृह खात्याचे ‘पोस्टमॉर्टेम’ केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे.