मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात मोठ्याप्रमाणात फेरबदल करण्यात येत आहे. नुकतेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंगळवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटलांकडे असल्याने तीन प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडे असल्याचा योगायोग पहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी म्हणून पक्षात फेरबदल करण्यास सुरवात केली आहे. मात्र या फेरबदलनंतर महाराष्ट्राला वेगळा योगायोग अनुभवला मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पश्चिम महाराष्ट्राचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील आहे. तर नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्षपद मिळाले महसूल मंत्री चंद्रकात पाटील हे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.
याधी असाच काही योगायोग पावसाळी अधिवेशनात पहायला मिळाला होता. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या काँग्रेसचेनेते विजय वडेट्टीवार हे विदर्भातील आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा विदर्भातील अशी चर्चा पहायला मिळाली होती.