शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

राज्य मार्ग हे राज्य महामार्गच!

By admin | Published: July 04, 2017 5:09 AM

राज्य मार्ग हे राज्य महामार्गच आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य मार्गांपासून ५०० मीटरच्या आत येणाऱ्या दारू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य मार्ग हे राज्य महामार्गच आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य मार्गांपासून ५०० मीटरच्या आत येणाऱ्या दारू विक्रेत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करता येणार नाही, असे उत्तर राज्य शासनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी त्यावर प्रत्युत्तर सादर करण्यासाठी बुधवारपर्यंत वेळ घेतला.या प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने परवान्याचे नूतनीकरण करून दिले नसल्यामुळे, विदर्भातील दोनशेवर बार व वाईन शॉप मालकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून ५०० मीटरच्या आत येणारे सर्व बार व वाईन शॉप बंद करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यांनुसार, त्यांचे बार व वाईन शॉप राज्य मार्गांवर आहेत. ते मार्ग राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या व्याख्येत मोडत नाहीत. महाराष्ट्र महामार्ग कायद्यातील कलम ३ अनुसार कोणत्याही मार्गाला राज्य महामार्गाचा दर्जा देण्यासाठी अधिसूचना जारी करणे आवश्यक आहे. याचिकाकर्ते ज्या राज्य मार्गांवर वसलेले आहेत त्याबाबत अशी अधिसूचना नाही, असा दावा याचिकांत करण्यात आला आहे.शासनाने लेखी उत्तरामध्ये स्वत:ची बाजू योग्य ठरवून याचिका फेटाळून लावण्याची विनंती केली आहे. राज्य मार्ग व राज्य महामार्ग एकच आहेत. शासन गेल्या अनेक वर्षांपासून राज्य मार्गांना राज्य महामार्ग समजत आहे. त्यामुळे अधिसूचना नसली तरी राज्य मार्गांवरील दारू विक्रेत्यांना परवाने देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून राज्य मार्गांना वगळता येणार नाही, असे शासनाचे म्हणणे आहे.