शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

राज्य मंडळाची लागणार कसोटी

By admin | Published: June 13, 2015 2:06 AM

शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार आता आॅक्टोबरऐवजी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच दहावीची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

पुणे : शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार आता आॅक्टोबरऐवजी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच दहावीची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे मंडळाला केवळ एक महिन्याचाच कालावधी मिळणार असल्याने तयारी करताना मंडळाची कसोटी लागणार आहे.मंडळाने शुक्रवारी परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या. आॅनलाइन अर्ज व शुल्क भरून संंबंधित विभागीय मंडळांकडे माहिती देण्याची अंतिम मुदत १ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केंद्र निश्चित करणे, विद्यार्थ्यांना, बैठक क्रमांक देणे, परीक्षक, पर्यवेक्षक अशा संबंधित घटकांची नेमणूक करणे, अशी कामे मंडळाला करावी लागणार आहेत. तसेच या कालावधीतच मॉडरेटरच्या बैठका घेणे, प्रश्नपत्रिका तयार करून त्याची छपाई, उत्तरपत्रिका उपलब्ध करून देणे, यांचेही नियोजन पार पाडावे लागणार आहे. आॅक्टोबर महिन्यात परीक्षा घेताना त्यासाठीची प्रक्रिया साधारणत: जुलै महिन्यापासूनच राबविली जात होती. त्यामुळे सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता. मात्र आता एका महिन्यातच सारे उरकावे लागणार आहे. तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्पडताळणी, पुनर्मूल्यांकनाच्या कामाचा ताणही मंडळांवर असणार आहे. त्यामुळे मंडळाची पुरती दमछाक होईल, असे चित्र आहे. महिनाभरात पेपर सेट करण्याबरोबरच, बैठक क्रमांक, केंद्रांची निवड या प्रक्रिया वेगाने कराव्या लागणार आहेत.