- राजरत्न सिरसाटअकाेला : कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने कृषी शिक्षणाचे पुढील २५ वर्षांचे नवे धाेरण निश्चित करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने कामही सुरू केले आहे. अलीकडच्या पाच-सात वर्षांत कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. ६० हजार जागांसाठी लाखाे विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात.राज्यात एकूण चार कृषी विद्यापीठे असून, पदविका, पदव्युत्तर व आचार्य पदवी मिळून प्रत्येक विद्यापीठात १५ ते १६ हजार म्हणजेच राज्यात ६० ते ७० हजार विद्यार्थी कृषीतील विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतात. विशेष म्हणजे सीईटी आणि नीट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाताे. याच शिक्षणात एकसूत्रता, गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी नवे कृषी शिक्षण ठरविण्यात येणार आहे. यात अनेक बाबी नव्याने ठरवण्यात येतील.अशी आहे समितीमाजी कुलगुरू डाॅ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीत दापाेलीच्या डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. एस. एस. मगर, अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) डाॅ. डी. एल. साळे, परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (कृषी) डाॅ. विलास पाटील व डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे विद्यमान अधिष्ठाता (कृषी) डाॅ. सतीश नारखेडे हे सदस्य असून, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यमान अधिष्ठाता (कृषी) तथा अध्यक्ष, संचालक शिक्षण समन्वय समिती डाॅ. अशाेक फरांदे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.समितीने काम सुरू केले असून, एक बैठक झाली आहे. दुसरी बैठक पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. शेतीशी निगडित विद्यार्थ्याला हे शिक्षण सुुलभरीत्या घेता यावे, असा मानस आहे.- डाॅ. एस. एन. पुरी, अध्यक्ष, कृषी शिक्षण धाेरण उच्चस्तरीय समिती.
राज्यात आता येणार नवे कृषी शिक्षण धाेरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 9:03 AM