विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात दहा लाख बोगस बँक खातेदार शेतकरी आहेत हे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान चीड आणणारे आहे. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची टीका भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी आज केली.धान उत्पादक, मच्छिमार आदींच्या प्रश्नावर खा. पटोेले यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते पत्र परिषदेत बोलत होते. मी आज मुख्यमंत्र्यांकडे बोगस शेतकºयांचा विषय काढला. त्यावर त्यांनी या विषयी त्यांच्याकडे काहीही माहिती आली नसल्याचे सांगितले. महसूलमंत्री पाटील यांच्याकडे दहा लाखांचा आकडा कुठून आला माहीत नाही. ते काहीही बोलून शेतकºयांच्या जखमांवर मीठ चोळत असतील तर मी शांत बसणार नाही. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, आॅनलाइन अर्जाची भानगड नकोच, असेही ते म्हणाले.फडणवीस जुने मित्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे जुने मित्र आहेत. मी चुकतो किंवा बदलतो तेव्हा त्याला बोलण्याचा दुसºया मित्राला अधिकार असतो. तेच मी करीत आहे, असे खा.पटोेले यांनी अलिकडे मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपाबाबत स्पष्ट केले.
महसूलमंत्र्यांचे विधान चीड आणणारे - नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 4:58 AM