शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

SSC Result 2019: राज्याचा दहावीचा निकाल जाहीर ; ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; यंदाही मुलींची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 11:25 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देमागील वषीर्पेक्षा 12.31 टक्क्यांनी उत्तीर्णतेचा टक्का घसरलाया परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. याबाबत शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९  दरम्यान परीक्षा पार पडली.यावषीर्ही राज्यात मुलींनी बाजी मारली.यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.या परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश होता. विभागवार सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा  तर सर्वात कमी निकाल नागपूर  विभागाचा लागला होता.

 मुलीं - 82.82, मुले 72.18दिव्यांग 83.05 एकून उत्तीर्ण - 1247903 परीक्षा दिलेले-  1618602100 टक्के गुण - 20 विद्यार्थी ( 16 लातूर, 1 अमरावती, औरंगाबाद 3 ) 1794 - 100 टक्के निकाल शाळा 

विभागानुसार निकाल खालीलप्रमाणे :- पुणे :82.48- नागपूर :67.27- औरंगाबाद :75.20- मुंबई :77.04- कोल्हापुर :86.58- अमरावती 71.98- नाशिक :77.58- लातूर :72.87- कोकण :88.30 

* निकालाची वैशिष्ट्ये एकूण 71 विषयांवर घेतल्या गेल्या परीक्षाविद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाइन बघता येणार निकाल19 विषयांचा निकाल 100 टक्के1हजार पेक्षा अधिक शाळांचा निकाल 100 टक्के

विद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाइन बघता येणार निकाल

* असा पाहा SSC निकाल www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org www.maharashtraeducation.comwww.mahresult.nic.in 

टॅग्स :PuneपुणेSSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी