शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

राज्याचे कृषी पर्यटन धोरण लवकरच- जयकुमार रावल

By admin | Published: May 16, 2017 8:43 PM

कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याला जोडव्यवसायाची आवश्यकता आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याला जोडव्यवसायाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाला मोठा वाव असून, त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण तयार केले आहे. हे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.दहाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय (पदूम) मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, अ‍ॅग्री टुरीजमचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे, गोवर्धन इको व्हीलेजचे निरज कपूर, कृषी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेले भगवान तावरे, माधव सानप, अभिजित फाळके आदी मान्यवर उपस्थित होते. एमटीडीसी आणि अ‍ॅग्री टुरीजम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मंत्री रावल म्हणाले की, आपले राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. याशिवाय राज्याला वेगळी अशी ऐतिहासीक, सांस्कृतिक ओळख आहे. राज्यात शहरीकरण हे साधारण ५० टक्क्यांपर्यत वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण जीवनशैली, कृषी संस्कृती यांचे आकर्षण वाढले आहे. या संधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. राज्य शासनानेही कृषी पर्यटनाला चालना देण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने समग्र असे कृषी पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. येत्या २३ मे रोजी यासंदर्भात वित्त आणि उर्जा मंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. धोरणाचा मसुदा तयार झाला असून त्यास मान्यता घेऊन लवकरच हे धोरण जाहीर करण्यात येईल.  कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक तरतुदी या धोरणात असतील, असे त्यांनी सांगितले.कृषी पर्यटनासाठी एमटीडीसीत स्वतंत्र अधिकारीकृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी व यासंदर्भातील योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात एक स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात येईल, असेही मंत्री रावल यांनी यावेळी जाहीर केले. राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे प्रमाण सर्वाधिक असून देशाच्या विविध भागातूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. एमटीडीसीमार्फत सुरु करण्यात आलेल्या महाभ्रमण योजनेतून अमरावती जिल्ह्यातील डीअर पार्क, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रोकोडाईल पार्क यांसारखे उपक्रम यशस्वी होत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पदूम मंत्री जानकर यावेळी म्हणाले की, कृषी विकासाला चालना देण्यासाठी शासनाने पदूम विभागावार विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी या क्षेत्रातही पदूम विभाग महत्वपूर्ण योगदान देईल. पर्यटन विभागामार्फत लवकरच जाहीर होणाऱ्या कृषी पर्यटन धोरणात पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसायासंदर्भातील तरतुदींचाही समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विविध पुरस्कारांचे वितरणदरम्यान, कृषी पर्यटनात विशेष कार्य करणाऱ्या विविध संस्था, व्यक्ती यांचा या परिषदेच्या समारोप समारंभात विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पर्यटन मंत्री श्री. रावल व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. चंद्रपूर येथील एक मोकळा श्वास अ‍ॅग्रीटुरीजम सेंटरचे सुहास अशेकर, थेऊर (जि. पुणे) येथील कल्पतरु अ‍ॅग्रीटुरीजम सेंटरचे प्रतिक कंद, मोराची चिंचोली (जि. अहमदनगर) येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंदराव थोपटे, औरंगाबाद येथील सृष्टी अ‍ॅग्रीटुरीजम सेंटरचे किरण सानप व प्रतिभा सानप, अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथील अदरना अ‍ॅग्रीटुरीजम सेंटरचे एन. रामकृष्णा, पालघर येथील गोवर्धन इको व्हीलेजचे नीरज कपूर यांना यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.समारोप समारंभात बोलताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, शेती व्यवसायाला उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधणे गरजेचे आहेत. यादृष्टीने कृषी पर्यटन हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्याला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.