शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर, सरकारचे मात्र कागदी घोडे, ९१ बंदरे अतिसंवेदनशील, नौदलाचा होता अहवाल

By नारायण जाधव | Published: August 18, 2022 9:39 PM

Maharashtra security: श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या एका संशयास्पद बोटीत तीन एके ४७ रायफली, काडतुसे आणि संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेमुळे राज्यासह देशाची संरक्षण यंत्रणा जागी झाली असून राज्याच्या गृह खात्याने रेड ॲलर्ट जारी करून संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई : ऐन दहीहंडी आणि गणेशोत्सव जवळ आलेला असताना राज्यातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या एका संशयास्पद बोटीत तीन एके ४७ रायफली, काडतुसे आणि संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेमुळे राज्यासह देशाची संरक्षण यंत्रणा जागी झाली असून राज्याच्या गृह खात्याने रेड ॲलर्ट जारी करून संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांतील घडामोडी पाहता केंद्र आणि राज्य सरकारने समित्या नेमणे, पाहणी करणे, धोकादायक बंदरांची यादी घोषित करणे, असे कागदी घोडे नाचविण्यापलीकडे ठोस उपाययोजना करण्याकडे कायम दुर्लक्ष केल्याचे श्रीवर्धन येथील घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

२००८च्या २६ नोव्हेंबर रोजी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यांनंतर खबरदारी म्हणून नौदलाने त्या काळात केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील सागरकिनाऱ्यावरील ५२५ मासेमारी बंदरांपैकी मुंबईच्या बधवार पार्क, गोराई-मनोरी, वाशी खाडीपूल, उत्तन, रेवस, मांडवा, दाभोळ, मालवणसह ९१ बंदरे अतिसंवेदनशील आढळली होती.

५९१ लँडिंग पॉइंट्सची केली होती तपासणीया हल्ल्यांनंतर नौदलाने मच्छीमार नौकांचे अवागमन असलेल्या राज्यांतील ५९१ लँडिंग पॉइंट्सची तपासणी केली होती. त्यात ९१ पॉइंट्स अतिरेकी हल्ल्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आढळले होते. यातील ५६ पॉइंट्स मत्स्य विकास विभागाच्या अखत्यारित येतात, तर ३५ लँडिंग पॉइंट्सवर मासळी उतरवली जात नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने या सर्व ९१ मच्छीमार बंदरांवर कडक सुरक्षा तैनात करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नौदलाने नोंदविले होते.

मात्र, यानंतर गेल्या १४ वर्षांत याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने जुजबी उपाययोजना वगळता ठोस असे काहीच केल्याचे दिसत नाही. यामुळे या सर्व बंदरांची सुरक्षा किती तकलादू आहे, हे श्रीवर्धन घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

केंद्राच्या ॲलर्टनंतर गठित केली सुरक्षा समितीनाही म्हणायला दोन महिन्यांपूर्वी राज्यातील लहान बंदरांच्या सुरक्षाव्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने कळविल्यानंतर तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने या बंदरांच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेऊन उपाययोजनांसाठी बंदर विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या किनारपट्टी सुरक्षेशी संबंधित विविध केंद्रीय आणि राज्य संस्थांमध्ये समन्वय साधून उपाययोजना करण्याचे काम या समितीवर सोपविले हाेते. मात्र, ही लहान बंदरे कोणती त्याचा तपशील याबाबतच्या १६ जून २०२२ रोजीच्या आदेशात दिलेला नव्हता.

या अधिकाऱ्यांची होती समितीमेरी टाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई विभागाचे शिपिंगचे महासंचालक, मत्स्य आयुक्त, सागरकिनारा सुरक्षा विभागाचे पोलीस महासंचालक, कोस्ट गार्ड कमांडर, महाराष्ट्राचे नेव्ही इन्चार्ज, मुंबईचे सीमा शुल्क आयुक्त आणि गृह मंत्रालयातील बंदर विभागाचे सहसचिव या अधिकाऱ्यांचा समितीत समावेश केला होता.

समितीवर हे काम सोपविले होतेसध्याच्या सुरक्षा परिस्थितीत विविध एजन्सीजच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे पुनरावलोकन करणे, अमली पदार्थ व तत्सम तस्करीसह मानव तस्करी वाढू नये याबाबत दक्षता घेणे, केंद्र/राज्य संस्थांकडून विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असलेले राखाडी क्षेत्र ओळखणे. बंदरांवर वीज व्यवस्था वाढविणे, सागरकिनाऱ्यांवर संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवून नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी मालमत्ता ओळखून किनारा सुरक्षा मजबूत करणे, सागरी/सुरक्षा भरती आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, पोलीस आणि मत्स्य विभागातील व्यावसायिक यांच्यात समन्वय साधण्यास या समितीस सांगण्यात आले होते.

२००८ मध्ये ही बंदरे आढळली होती अतिसंवेदनशीलमुंबई : बधवार पार्क, गणेशमूर्ती नगर, गीतानगर, गोराई, मनोरी, वांद्रे सागरी सेतू जेट्टी, सांताक्रुझ जेट्टी, वर्सोवा, पिरवाडी, माणिकटोकठाणे जिल्हा : उत्तन, दिवाळे, बेलापट्टी, पाली, वाशी ब्रिज, सारसोळेपालघर जिल्हा : नरपाडा-डहाणू, गुंगवाडा-धाकटी डहाणू, वरोर, तडीयाळ, कंबोडे, घिवलीगाव, रानगाव, वसई-बॅसिन, खोचिवडे, पाचूबंदर, पाणजू, भुईगाव, कोल्लार, सुरूची बाग, अर्नाळा, वैतरणा, मारबंळपाडारायगड जिल्हा : मांडवा, रेवस, जुनी आरसीएफ जेट्टी, थळनवगाव, अलिबाग चौपाटी, रेवदंडा ब्रिज-१, रेवदंडा ब्रिज-२, साळाव, नांदगाव, मुरुड खोरा, आगरदांडा-१, राजपुरी, दिघी पोर्ट जेट्टी, दिघी पॅसेंजर जेट्टी, शेखाडी, जीवनाबंदर, बागमांडला, मांदाड-१, दादर, आंबेतरत्नागिरी जिल्हा : वेशवी, वेळास, केळशी, दाभोळ, वेलदूर, रानवी, पडवे, जयगड, नांदिवडे, सैतवडे, जांभारी, गणपतीपुळे, काळबादेवी, रनपार-घोळप, पूर्णगड, मिया, भगवती बंदर, नेवरे, कुर्ले, साखरी नाटे, मुसाकाझी, अंबोळगड, माडबनसिंधुदुर्ग जिल्हा : मीठमुंब्री-तारांबुरी, कुणकेश्वर, काटवन, तांबडडेग, सर्जेकोट-मियाबाद, तारकर्ली-काळेथर, मालवण जेट्टी, खवणो, वेंगुर्ला, मोचेमाड, आरवलीटाक, तेरेखोल, देवगड, गजबादेवी...

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkonkanकोकण