शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

कोरोना महासाथीच्या संकटातही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 6:25 PM

Maharashtra Budget Session 2021 : २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा पाहणी अहवाल शुक्रवारी सादर करण्यात आला.

ठळक मुद्दे२०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा पाहणी अहवाल शुक्रवारी सादर करण्यात आला.पटोलेंनी साधला केंद्रावर निशाणा

कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील सर्वच क्षेत्रात मोठी घसरण झाली. उद्योगधंद्यांसमोर मोठे संकट उभे ठाकल्याने आर्थिक प्रगतीला खिळ बसली असली तरी कृषी क्षेत्रातील कामगिरी चांगली झाल्याने दिलासादायक चित्र असून या अत्यंत कठीण परिस्थीतीतही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. राज्याचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा पाहणी अहवाल शुक्रवारी सादर करण्यात आला, त्यावर नाना पटोले बोलत होते. 

"कोरोना महासाथीदरम्यान केंद्राचे आर्थिक असहकार्य, आरोग्याच्या सोयीसुविधा न पुरवणे तसेच १ लाख ५६ हजार कोटींचा महसूल कमी असतानाही ३१ लाख ४ हजार शेतकऱ्यांना १९ हजार ८४७ कोटींची कर्जमाफी केली. १० लाख लिटर दुध रोज घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. सेवा व उत्पादन क्षेत्राला महामारीचा फटका बसला असतानाही महाराष्ट्रातील मेहनती शेतकऱ्याने ११.७ टक्क्याचा विकास दर ठेऊन अर्थव्यवस्थेला उभारी दिली. तसेच एका गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की संकटात संधी समजून पेट्रोल डिझेलवर कोणत्याही प्रकारचा कर लावला नाही," असेही पटोले यावेळी म्हणाले. मजुरांना राज्यात येण्यास प्रोत्साहित केलं"अनलॉक करत असताना उद्योग लवकरात लवकर सुरु झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करुन गावी गेलेल्या मजुरांना परत महाराष्ट्रात येण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्पात या अडचणी जरी दिसल्या तरी येणाऱ्या वित्तीय वर्षात केंद्राचे असहकार्य असतानाही महाविकास आघाडी सरकार दमदार कामगिरी करुन राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आणेल असे संकतेही या अहवालात दिसून येत आहेत," असे त्यांनी नमूद केले.   

मुद्रांक शुल्कात सूटकोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात सरसकट ३ टक्के सवलत दिली होती. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१९ च्या तुलनेत दस्तनोंदणीत ४८ टक्के वाढ झाली. डिसेंबर २०१९ मध्ये २ लाख ३९ हजार २९२ दस्तनोंदणीसह २ हजार ७१२ कोटींचा असलेला महसूल डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ४ लाख ५९६०७ दस्त नोंदणी होऊन ४ हजार ३१४ कोटींचा महसूल मिळाला, डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल ९२ वाढ टक्के तर महसूलात ५९ टक्के वाढ झाली. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मितीचे प्रयत्नही केल्याचे पटोले म्हणाले. केंद्राकडून हक्काचे पैसे मिळाले नाही"कोरोनाच्या संकटात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने राज्याच्या महसुलावर परिणाम झाला हे उघड असताना केंद्र सरकारने राज्याच्या हक्काचे पैसेही दिले नाहीत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला ८० हजार १६४ कोटी रुपये येणे बाकी आहे. या रकमेत अजून आदिवासी विभागाच्या योजनांसाठी मिळणाऱ्या रकमेचा समावेश नाही. जीएसटीचा परतावा वेळेवर दिला जात नाही," असेही पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसEconomyअर्थव्यवस्थाAjit Pawarअजित पवार