मुंबई : देशाच्या उत्तरेसह दक्षिणेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांत गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे, तर स्कायमेटच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत मुंबईत चांगला पाऊस अपेक्षित आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत कोकणासह गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे, तर १० ते १३ सप्टेंबर या कालावधीत गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ८.९ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.
राज्याला मुसळधार पावसाचा इशारा
By admin | Published: September 10, 2015 2:47 AM