पंकज रोडेकर,
ठाणे- शासकीय रुग्णालय म्हटले, नेहमीच रुग्णाच्या नातेवार्इंकांची बोंम्बा-बोम्ब असते. मात्र, ठाणे सायन्ना शासकीय रुग्णालयाने या गोष्टीला छेद देऊन, नवा फंडा घातला आहे. या रुग्णालयात पोलिसांनी दाखल केलेल्या अनोळखी तरुणावर वेळीच योग्य उपचार करून त्याची ओळख पटवून त्याला स्वगृही धाडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या रुग्णाला धड बोलताही येत नसताना, त्याच्याकडून मिळणाऱ्या अपुऱ्या आणि तोकड्या माहितीच्या आधारे जिल्हारुग्णालय प्रशासनाने त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला आहे.नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यापूर्वी घनश्याम हा जखमी अवस्थेत पोलिसांना सापडला. त्याच्या डोक्यावर जखम झाल्याने आणि त्याला वारंवार आकडी येत असल्याने पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी जिल्हा सामान्य रु ग्नालयातील डॉ. शिंदे, डॉ.शामा राठोड व आर.के.काळे या पथकांने त्याच्या उपचारावर विशेष लक्ष देत बरे केल्यानंतर रु ग्णालयातील मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग सिद यांनी त्याला नाव विचारले असता, तो केवळ घनश्याम कंचम एवढेच सांगायचा. तसेच गावाचे नाव सुसकाल येवढेच सांगत असे. घनश्यामला नीट बोलता येत नसल्याने त्याला घरी पाठविण्याचा पण या मंडळींनी केला. त्याच्या गावापासून नातेवाईकांचा शोध सुरू झाला. सिद यांनी डॉ. चंद्रशेखर सावंत यांच्या मदतीने सोशल मिडीयाचा वापर करून सुसकाल म्हणजे काय ते कुठे आहे. याचा शोध घेतला. सुसकाल हे गुजरात राज्यातील छोटे उदयपूर या जिल्ह्यातील जेठापूर तालुक्यात असल्याचे समोर आले. तेथील स्थानिक पोलीस ठाण्याचा शोध घेतल्यावर जेठापूर पोलिसांशी संपर्कत्यांना साधून घनशाम कंचम हा तरु ण ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. त्या पोलिसांनी गावातील सरपंचाच्या मदतीने या नावाची व्यक्ती येथे राहत असल्याबाबत चौकशी केली. त्यात घनश्याम हा काका संजू राठोड यांच्यासमवेत राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याची ओळख पटवून त्याला नातेवाईकांसह स्वगृही पाठवण्यात आले.>अनोळखी म्हणून उपचारार्थ दाखल झाल्यावर त्याच्यावर वेळीच उपचार झाले.त्यानंतर तो हरवल्याचे समोर आल्यावर तो स्वगृही गेलाहे विशेषच आहे. त्यातच रुग्णाची सेवा करून त्याला अशाप्रकारे घरी पाठविण्यात रु ग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत ही विशेषच आहे.- डॉ.केम्पी पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रु ग्णालय