मुंबई : राज्यात तापमानाचा पारा वाढतच असून, रविवारी बहुसंख्य शहरांचे तापमान चाळिशीवर गेले. भिरा (रायगड) येथे सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. रविवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. पुढील २४ तासांत विदर्भात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.मुंबई आणि आसपासच्या परिसराला हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी शहराच्या कमाल तापमानाचा आलेख चढाच आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. शनिवारच्या तुलनेत ३ अंशांची वाढ झाली. भिरा (रायगड), नांदेड, मालेगाव, सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा या शहरांचे तापमान रविवारी चाळीस अंशाच्या पुढे होते. बहुतांश शहरांचे किमान तापमान २२ ते २७ अंशाच्या घरात होते. मागील आठवड्यापासून मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)प्रमुख शहरांचे तापमान भिरा (रायगड) ४३, नांदेड ४२, परभणी ४१.५, मालेगाव ४१.४, सोलापूर ४१.३, चंद्रपूर ४१, ब्रह्मपुरी ४०.१, वर्धा ४०.५, अकोला ४०.२, नागपूर ३९.८, यवतमाळ ३९.५, सांगली ३९.१, उस्मानाबाद ३९.१, जळगाव ३९, पुणे ३८.७, नाशिक ३८.४, सातारा ३८.२, गोंदिया ३८.६, कोल्हापूर ३८, औरंगाबाद ३८, बुलडाणा ३८, वाशिम ३४.६, अमरावती ३४, महाबळेश्वर ३३.८, अलिबाग ३१.६, मुंबई ३३.२, डहाणू ३३, रत्नागिरी ३२.२. (अंश सेल्सिअस) हवामान अंदाज : २८ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. २९, ३०, ३१ मार्च : संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.मुंबईचे हवामान : २८ व २९ मार्च : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २३ अंशाच्या आसपास राहील.
राज्याचा पारा चाळिशीपार; उकाडा वाढला
By admin | Published: March 28, 2016 3:48 AM