पुणे : विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही आता उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. प्रमुख शहरांमधील तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असून, झळा असह्य होत असल्याने भर दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.मंगळवारी मध्य महाराष्ट्र व कोकणातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते ३ अंशांनी वाढले आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान भीरा येथे ४३.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. सांगली, मालेगाव, सोलापूर येथील तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. त्याचबरोबर, मराठवाडा विदर्भातही तापमान ४० ते ४२ अंशापर्यंत कायम आहे. (प्रतिनिधी)प्रमुख शहरांतील कमाल तापमान पुणे : ३९.८, लोहगाव ४०.६, जळगाव ४१.६, कोल्हापूर ३९.२, महाबळेश्वर ३३.९, मालेगाव ४२, नाशिक ३८.६, सांगली ४०.१, सातारा ३८.९, सोलापूर ४१.७, मुंबई ३१.८, सांताक्रुझ ३३, अलिबाग ३०.४, रत्नागिरी ३२.९, उस्मानाबाद ४०.६, औरंगाबाद ३९.५, परभणी ४२.५, नांदेड ४२.५, अकोला ४१.५, अमरावती ४०.२, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४१.६, चंद्रपूर ४२.४, गोंदीया ४०, नागपूर ४२, वाशिम ३८.२, वर्धा ४२, यवतमाळ ४१.२
राज्याचा पारा चाळीशीपार
By admin | Published: April 14, 2016 1:24 AM