अकोला : केंद्र शासनाच्यावतीने नेहरु युवा केंद्र चालविले जाते. त्याच धर्तीवर राज्यात विवेकानंद युवामित्र योजना सुरु करण्यात येत आहे. या योजनेत जिल्हा व तालुकास्तरावर युवामित्रांची नियुक्ती केली जाणार असून, त्यांना अनुक्रमे पाच व तीन हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या युवामित्रांना त्यांच्या परिसरात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल जनजागृती करावी लागणार आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने नेहरु युवा केंद्राची स्थापना केली. या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याबरोबरच समाजात जनजागृती करण्याचे काम केले जाते. हे कार्य लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यात ह्यविवेकानंद युवकमित्रह्ण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या आघाडी शासनाने जे युवा धोरण जाहीर केले होते, त्यात अशा प्रकारचा उपक्रम सुरु करण्याचे सुतोवाच केले होते. युती सरकारने १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती दिनी विवेकानंद युवामित्र उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या अख्यारित हा उपक्रम राबविण्यात येईल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार्या युवकांना या उपक्रमात प्राधान्य दिले जाईल. युवामित्राला दर महिन्याला मानधन दिले जाणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने युवकांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे *अशी असेल योजनायुवामित्र योजनेअंर्तगत राज्यातील ३६ जिल्हे, ३५८ तालुके आणि मुंबईतील २४ विभागांमध्ये युवामित्र नियुक्त केले जाणार आहेत. जिल्हास्तरावर काम करणार्या युवामित्राला ५ हजार रुपये, तर तालुकास्तरावरील युवामित्राला ३ हजार रुपये प्रति महिना मानधन दिले जाईल. युवामित्रांना व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शासनाच्या विविध योजनांबद्दल समाजात जनजागृती करावयाची आहे.
राज्याची आता विवेकानंद युवामित्र योजना!
By admin | Published: January 17, 2015 12:09 AM