पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालक व वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेत ७४२ महिलांसह एकूण ३० हजार ६८ उमेदवार पात्र ठरले आहे.महामंडळामार्फत एकूण ८०२२ पदांसाठी दि. २४ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ३५ हजार ४६३ हजार उमेदवार बसले होते. त्यापैकी ३० हजार ६८ उमेदवार पात्र ठरले आहेत. पुणे विभागात एकूण ७ हजार १४८ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ हजार १८३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ११७ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक महिला उमेदवार पुणे विभागात उत्तीर्ण झाल्या आहेत, तर राज्यामध्ये ७४२ महिला उमेदवार पात्र ठरल्या आहेत. महामंडळाच्या ६६६.े२१३ू.ॅङ्म५.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र व शारीरिक उंची व अन्य पात्रतेसंबंधीची तपासणी झाल्यानंतर १०० गुणांची संगणकीकृत वाहन चालन चाचणी होणार आहे. या चाचणीचे गुण व लेखी परीक्षेचे गुण एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल; तसेच ज्या महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत, त्यांची केवळ शारीरिक उंची व अन्य पात्रतासंबंधीच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन त्यांना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
एसटीच्या चालक-वाहक परीक्षेचा निकाल जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 2:48 AM