शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळला

By admin | Published: June 15, 2017 8:03 PM

हिंदू देवतांचा अवमान व विटंबना केल्याप्रकरणी सिल्लोड शहरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुतळयाला जोडे मारून आणि पुतळा जाळून

ऑनलाइन लोकमत

सिल्लोड(औरंगाबाद), दि. 15 - हिंदू देवतांचा अवमान व विटंबना केल्याप्रकरणी सिल्लोड शहरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुतळयाला जोडे मारून आणि पुतळा जाळून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर हिंदू जागरण मंचच्या वतीने गुरुवारी एक तास  निदर्शने व आंदोलन करण्यात आली. अब्दुल सत्तार मुर्दाबाद... त्यांना अटक करा..  हिंदू देवतांचा अवमान व विटंबना केल्याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.. तसेच शहर पोलिस ठाण्यात सुद्धा गुन्हे दाखल करा या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यात एक तास गोंधळ घातला होता.

ग्रामीण पोलिस ठाण्यात आ. विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे. पुन्हा शहर पोलिस ठाण्यात तोच गुन्हा दाखल करता येणार नाही..त्याच गुह्यात आपले स्टेटमेंट घेतले जातील असे आश्वासन पोलिस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी दिल्याने निदर्शन कर्त्यानी  निदर्शन मागे घेतले. मात्र आ. अब्दुल सत्तार यांना अटक केली नाही तर शिवसेने तर्फे आज  शुक्रवारी रास्ता रोको व शनिवारी हिंदू जागरण मंच , भाजप, शिवसेना यांनी सिल्लोड शहर बंद करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

दहिगाव तालुका सिल्लोड येथे जमिनीच्या वादातुन आ. अब्दुल सत्तार यांनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ करतांना  समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान ब्रम्हचारी  हनुमान यांचे नाव घेऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यामुळे समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या  त्यामुळे सर्व हिंदू  बांधवांनी आज गुरुवार (दि.१५) रोजी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर एकत्रीत येऊन आ.अब्दुल सत्तार यांचा निषेध नोंदविला. त्यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी माजी आ.सांडू पाटील लोखंडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे,माजी तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर,कमलेश कटारिया,विनोद मंडलेचा,हिन्दू जागरण समितीचे अध्यक्ष मनोज मोरेल्लू, कारखान्याचे माजी चेरमन श्रीरंग साळवे, पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर तायडे, शिवसेनेचे गटनेता नगरसेवक सुनिल मिरकर, शिवसेना तालुका  प्रमुख किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल,,अनिल खरात, रघुनाथ घरमोडे, सुनिल काळे, शामराव आळणे, विजय वानखेडे, विठठल वानखेडे,मच्छींद्र धाडगे, शिवा टोम्पे, मकरंद कोर्डे सहित शेकडो नागरिकांनी निदर्शन आंदोलन करुण आ अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळला.शिवसेनेचा सिल्लोड येथे आज रास्ता रोको...आ. अब्दुल सत्तार यांना 12 तासाच्या आत अटक केली नाही तर सिल्लोड शहरातील आम्बेडकर चौकात शुक्रवारी सकाळी 11 वाजता शिवसेने तर्फे रास्ता रोको आंदोलन करून तीव्र निदर्शन करण्यात येईल असे  निवेदन शेवसेनेतर्फे शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भागीरथ देशमुख यांना गुरुवारी देण्यात आले. या निवेदनावर गटनेता सुनील मिरकर, तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख मछिंद्र घाडगे, राजेंद्र क्षीरसाठ, प्रवीण मिरकर, रवी रासने, शिवा टोम्पे, कैलास वराडे, संजय बड़क, गोपाल मंडावत यांच्या सह्या आहेत.शनिवारी हिंदुत्व वादी संघटने कडून सिल्लोड बंदची हाक....या प्रकरणी आ अब्दुल सत्तार यांना अटक करावी या मागणी साठी हिंदुत्व वादी संघटने तर्फे शनिवारी दी 17 रोजी सिल्लोड शहर बंद ची हाक देण्यात आली असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी दिली.(फोटो)