शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं ६ दिवसांत दोनदा अनावरण होणार; शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 11:34 AM

वर्षभरापासून अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण रखडलं; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हिंगोली: औंढा नागनाथमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा आमनेसामने आले आहेत. गेल्या वर्षभरापासून अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं लोकार्पण रखडलं आहे. आता शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी लोकार्पणाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. (statue of ahilyadevi holkar will be unveiled twice in 6 days by shiv sena and bjp)अनेक मंदिरांची उभारणी आणि जीर्णोद्धार करून हिंदू संस्कृती अबाधित ठेवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा हिंगोलीतल्या औढा नागनाथ ट्रस्टनं उभारला आहे. पण या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) गेल्या वर्षभरापासून वेळ मिळालेला नाही. ते बहुधा माझं कुटुंब माझी जबाबदारी यात व्यस्त आहेत, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी लगावला.मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ नाही- पडळकरमहापराक्रमी मल्हाररावजी होळकर यांची जयंती १६ मार्चला आहे. या दिवसांचं औचित्य साधून दुपारी १ वाजता अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल. मेंढपाळ बांधव आणि भगिनींच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण होईल. या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक व्हावं, असं आवाहन पडळकर यांनी केलं.'त्या' सुसाईड नोटवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणारशिवसेना ११ मार्चला अनावरण करणारअहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण ११ मार्च रोजी करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील ज्येष्ठ वयोवृद्ध भूषण होळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिली. ते म्हणाले, आधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्याचं ठरलं होतं. मात्र कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. या पुतळ्याचं अनावरण लवकर व्हावं ही समाजाची भावना लक्षात घेता महाशिवरात्रीच्या दिवशी हे अनावरण होणार आहे.पडळकरांनी लिहिलं होतं मुख्यमंत्र्यांना पत्रअहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या अनावरणास होत असलेल्या विलंबाबद्दल गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. 'बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत मंदिर समितीद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पण हा पुतळा गेल्या वर्षभरापासून लोकार्पणापासून वंचित आहे. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना पुतळा अनावरणाला वेळ मिळत नसल्यानं आजही अहिल्यादेवींचा पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून दुर्लक्षितपणे उभा आहे. ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे,' असं पडळकर यांनी पत्रात म्हटलं होतं.'अहिल्यादेवी होळकरांचं कार्य राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. किरकोळ श्रेयवादासाठी लोकार्पण वर्षभर थांबवणं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतींचा अपमान केल्यासारखं आहे. येत्या पंधरा दिवसात या पुतळ्याचं अनावरण करावं. अन्यथा पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर श्रद्धा असणारे भक्त व समस्त समाज बांधवांच्या हस्ते भूषणसिंहराजे होळकर यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल,' असा इशारा पडळकर यांनी दिला होता.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे