लोकमत न्यूज नेटवर्कमिरजगाव/अहमदनगर : कोपर्डी (ता. कर्जत) येथे पीडित मुलीच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या मध्यरात्री समाधीस्थळावर बसविण्यात आलेला पुतळा शनिवारी काढून ठेवण्यात आला. वाद टाळण्यासाठी पीडित मुलीच्या आई-वडिलांनीच पुतळा काढण्याचा निर्णय घेतला असून, आता तेथे फक्त समाधी राहणार आहे.मानवतेला काळिमा फासणाऱ्या कोपर्डी येथीलघटनेला गुरुवारी एक वर्ष झाले. पीडित मुलीवर अंत्यसंस्कार झालेल्या शेतात चौथरा बांधण्यात आला. त्याच ठिकाणी स्मारक बांधण्यासाठी भय्यूजी महाराज यांनी मदत केली. मात्र समाधीस्थळावर स्मारक करण्यास व पुतळा बसविण्यास संभाजी ब्रिगेडने विरोध केला. त्यामुळे पुतळा अनावरण कार्यक्रम रद्द झाला होता. मुलीच्या वडिलांचे पत्र१३ जुलैला वर्षश्राद्ध असल्याने मुलीचा पुतळा बसविण्याची आमच्या कुटुंबीयांची इच्छा होती. त्याप्रमाणे पुतळा बसविण्यात आला. मात्र त्यामुळे भय्यूजी महाराजांवर आरोप सुरू झाले. त्यामुळे आमचे कुटुंब व्यथित झाले. समाजाचे स्वास्थ्य बिघडणार नाही, यासाठी पुतळा काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणीही या विषयावर वाद निर्माण करू नये, अशी विनंती करणारे पत्रच पीडित मुलीच्या वडिलांनी दिले आहे.मराठा क्रांती मोर्चाचे पत्रकमराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते कृष्णा शेळके यांनी शनिवारी निवेदन जारी करून पुतळ्याचा वाद संपला असल्याचे म्हटले आहे. संभाजी ब्रिगेडने आंदोलन करण्याऐवजी चर्चा केली असती, तर प्रश्न मिटला असता, असे त्यांनी सांगितले.
कोपर्डी येथील पुतळा काढला
By admin | Published: July 16, 2017 12:42 AM