लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : शौर्य आणि पराक्रमाची अनेक स्मारके आहेत़ प्रेरणा मिळावी, हा त्यामागील उद्देश असतो़ कोपर्डीत मात्र अत्याचार करून निर्घृण खून झालेल्या मुलीचा प्रतीकात्मक पुतळा बसविण्यात आला आहे़ वर्षश्राध्दानंतर रातोरात हा पुतळा बसवून तो कापडाने झाकून ठेवण्यात आला़ दरम्यान, स्मारकाचे षडयंत्र भय्युजी महाराजांचेच असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे़ कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला़ या घटनेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले़ पीडित मुलीचे श्राध्द घातले़ हा कार्यक्रम आटोपून सकल मराठा समाजाचे राज्यभरातून आलेले समन्वयक घरी परतले़
कोपर्डीत रातोरात बसविला पीडितेचा पुतळा
By admin | Published: July 15, 2017 4:53 AM