ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि.13 - भगवानगड येथील दसरा मेळाव्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविषयी एकेरी भाषेत केलेल्या टिकेच्या निषेधार्थ शहरात राष्ट्रवादीतर्फे जानकर यांचा प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुतळा जाळण्याचा प्रयत्न होताच तो पोलिसांनी हाणून पाडला व पुतळा जप्त केला.प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल-बूट मारून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन दिले़राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून यावल रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन केले़ त्यानंतर पदाधिकारी पायीच प्रांत कार्यालयावर पोहोचले़ तेथे गाढवावर जानकर यांची प्रतिमा असलेल्या छायाचित्राला चप्पल-बूट मारण्यात आली. प्रतिकात्मक पुतळा पेटवत असतानाच पोलिसांनी तो जप्त केला.आंदोलनात पणन संचालक अॅड.रवींद्र पाटील, प्रदेश सदस्य विजय चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन निकम, तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, शहराध्यक्ष डॉ़दीपक पाटील, मुन्ना सोनवणे, शेख पापा शेख कालू, दिलीप सुरवाडे, रईस खान तुराब खान यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.पुन्हा दिसली गटबाजी...राष्ट्रवादीतील गटबाजी आजच्या आंदोलनातही दिसली़ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह अन्य पदाधिकारी अनुपस्थित होते.
जानकरांचा पुतळा दहनापूर्वीच केला जप्त
By admin | Published: October 13, 2016 5:21 PM