चिखली (जि. बुलडाणा), दि. १३ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे पुतळे जाळल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नांदुरा तालुक्यातील शेतकर्यांना पीक विमा एकरी २८ रुपये मिळाल्याच्या निषेधार्थ शेतकर्यांनी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या घटनेचा निषेध म्हणून येथील भाजयुमो कार्यकर्त्यांंनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर या नेत्यांचे पुतळे जाळले. नेत्यांचे पुतळे जाळल्यानंतर ह्यस्वाभिमानीह्णच्या कार्यकत्यार्ंनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत भाजयुमो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी केली. दरम्यान, पोलीसांनी जमाबंदी आदेश झुगारल्यामुळे कलम १३५ अन्वये मुंबई पोलीस कायद्यान्वये भाजयुमोच्या ८ ते १0 कार्यकर्त्यांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.'त्या' घटनेशी स्वाभिमानीचा संबंध नाही-तुपकरनांदुरा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री फुंडकर यांचा पुतळा जाळल्याचे वृत्त चुकीचे असून या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिले आहे. पीक विमा कंपन्याबरोबर झालेले करार हे ना. भाऊसाहेब फुंडकर व ना. सदाभाऊ खोत कृषिमंत्री होण्यापूर्वीचे आहेत. तरीसुद्धा दोषी अधिकार्यांवर चौकशी करून कारवाईचे निर्देश मंत्रीद्वयांनी दिले आहेत. अशी आंदोलने करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असून ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. समाधान भातुरकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या अगोदर संघटनेतून हकालपट्टी केली असून त्यांचा आणि स्वाभिमानीचा काहीही संबंध नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.
भाजयुमोने जाळले 'स्वाभिमानी'च्या नेत्यांचे पुतळे
By admin | Published: September 14, 2016 1:06 AM