पुणे : ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे, हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. तसेच आरक्षण न मिळाल्यामुळे ब्राह्मण समाजातील मुले परदेशात जात असलीत तर आरक्षण घेऊन त्यांनी इथेच राहावे, असा चिमटा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना काढला.महापौर टिळक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आठवले यांनी उत्तर दिले़ (प्रतिनिधी)
...तर आरक्षण घेऊन येथेच राहा!
By admin | Published: May 01, 2017 3:40 AM