शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

ट्रकची एसटीला धडक

By admin | Published: December 10, 2015 3:16 AM

चिपळूणहून रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने सात प्रवासी जागीच ठार तर अन्य ३१ जण जखमी झाले. मृतांमध्ये पिता-पुत्रासह एका महिलेचा समावेश आहे.

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने सात प्रवासी जागीच ठार तर अन्य ३१ जण जखमी झाले. मृतांमध्ये पिता-पुत्रासह एका महिलेचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर बावनदीपासून जवळ असलेल्या सुतारवाडी येथे बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. अपघातामुळे तब्बल साडेचार तास वाहतूक ठप्प झाली.चिपळूण एसटी आगारातून बुधवारी सकाळी ७.४५च्या सुमारास रत्नागिरीकडे निघालेली ‘सोनहिरा एक्स्प्रेस’ ही परिवर्तन बस सकाळी नऊच्या सुमारास बावनदी पुलाच्या पुढे सुतारवाडी वळणावर आली. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कोळसावाहू ट्रकने बसला धडक देत फरफटत नेले. बसमधील प्रवाशांना काही कळायच्या आधीच बस दरीच्या अगदी काठावर कलंडली. त्यातच हा ट्रक बसवर उलटल्याने बसचा चक्काचूर झाला.या अपघातात प्रभाकर शंकर क्षीरसागर (४०, सावर्डे, ता. चिपळूण, मूळ रा. सातारा), संतोष सीताराम करजावकर (४५, ठाणे), भास्कर सखाराम कोकाटे (६०, असुर्डे-सावर्डे, ता. चिपळूण), श्रीरंग ऊर्फ नारायण श्रीपाद कुलकर्णी (४५, कुंभारखणी, ता. संगमेश्वर), राजाराम नारायण कुलकर्णी (१२, कुंभारखणी, ता. संगमेश्वर), विजया शिवराम सुर्वे (४०, कुंभारखणी, ता. संगमेश्वर), यशवंत धर्माजी मोहिते (६०, जाकादेवी, ता. रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, जखमींपैकी २७ जणांवर जिल्हा रुग्णालयात, तर चारजणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक साडेचार तास ठप्प झाली. अपघातस्थळाच्या दोन्ही बाजूंनी चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी दीड वाजता वाहतूक पूर्ववत सुरू झाली. (प्रतिनिधी)> बसचा पत्रा कापून प्रवाशांना काढले बाहेरबस ट्रकच्या खाली दबल्याने काही प्रवाशांना बाहेर काढणे कठीण काम होते. अखेर रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने कटरने बसचा काही भाग कापत आतील प्रवाशांना बाहेर काढले. तब्बल तीन तास कटरद्वारे बसचा पत्रा, सीटस् कापण्याचे काम सुरू होते. ट्रकमधील दगडी कोळसा जेसीबीने बाजूला काढण्यात आला. दोन क्रेनच्या सहायाने पूर्णत: खिळखिळी झालेली बस व ट्रक खेचून रस्त्यावर आणली गेली.> पोलादपूर : महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगारी गावाजवळ अंजुमन हायस्कूललगत एसटी व ओम्नी कारची समोरासमोर धडक बसली. यात ओम्नी कारमधील चालक राकेश मोरे (२२, रा. परसुले, ता. पोलादपूर) व सहप्रवासी रुपाली वाडकर (रा. जांभळी, ता. वाई) हे जागीच ठार झाले. तर एसटी बसमधील महादेव दानवले, शैला दानवले, तुकाराम गोळे व रवी कदम हे किरकोळ जखमी झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात सकाळी ७.४५ च्या दरम्यान घडला.