मुंबई, दि. 14 - शेतक-यांच्या प्रश्नांसाठी लढा देणा-या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा दिली आहे. ‘प्रहार’ व ‘जय जवान, जय किसान’ या दोन्ही संघटनांनीही एकत्र येत आंदोलनाची मशाल हाती घेतली आहे. त्यानुसार राज्यातील काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
वर्धा : शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणासाठी प्रहार संघटनेने जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. भुगाव टी पॉईंटजवळ हे आंदोलन करण्यात आले. हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे रास्तारोको सुरू आहे. नांदेड ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर हे गाव असल्याने रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
बीड : परळी-बीड मार्गावर तेलगाव व गेवराई-बीड या महामार्गावर पाडळसिंगR येथे शेतक-यांचा सकाळपासूनच रास्ता रोको सुरू असल्याने वाहतूक खोळंबली आहे. गेवराई तालुक्यात सुकाणू समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जातेगांव फाटा, पाडळसिंग, चकलांबा व कोळगाव येथे जक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे 100 बैलगाड्यासह शेतकरी रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले आहेत.
जळगाव : सोमवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र किसान सभेतर्फे अमळनेर येथे धुळे रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जाची होळी केली. विशेष म्हणजे खबरदारी घेत आंदोलकांनी शांतेत आंदोलन पार पाडले.
शेलपिंपळगाव : शेलगाव (ता.खेड) येथे चाकण-शिक्रापूर राज्य महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेधही करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
परभणी
यवतमाळ शहरातील बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये शेतक-यांचा चक्काजाम
दरम्यान, सुकाणू समितीचे सदस्य आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत रविवारी नागपुरात ‘जय जवान, जय किसान’च्या कार्यालयात बैठक झाली. यात ‘जय जवान, जय किसान’चे संयोजक प्रशांत पवार यांच्यासह अविनाश शेरेकर, विजय शिंदे, अरुण वनकर, रमेश कारेमोरे आदी उपस्थित होते. या बैठकीत सोमवारचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांकडून आंदोलन दडपण्याची शक्यता विचारात घेता आंदोलनाची वेळ व स्थळ जाहीर करणे टाळण्यात आले. या वेळी आ. कडू म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकºयांची फसवणूक करणार आहे. कर्जमाफी देताना लादलेल्या अटी जाचक व अपमानास्पद आहे. अधिवेशनात आमदारांनी शेतक-यांचे प्रश्न मांडले. शेतक-यांच्या संघटनांनी आंदोलने केली. मराठा मोर्चातही शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने शेतक-यांच्या प्रश्नांची दखल घेतलेली नाही. यावर विचार करून सुकाणू समितीने पुन्हा आरपारची लढाई लढण्याची भूमिका घेतली आहे. प्रशांत पवार म्हणाले, शेतक-यांना ऑनलाईन अर्ज करायला लावणे हे फसवे धोरण आहे. शेतक-यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.सेवाग्राम ते गडचिरोली संघर्षयात्राप्रहार व जय जवान जय किसान या दोन्ही संघटना एकत्र येत सेवाग्रम ते गडचिरोली संघर्षयात्रा काढणार आहेत. या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊन शेतक-यांमध्ये जनजागृती केली जाईल. या यात्रेचा कार्यक्रम आखण्यासाठी तीन दिवसांनी आढावा बैठक घेतली जाईल, असे बैठकीत ठरले.