यदु जोशी, मुंबईलोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी सीआयडीने अखेर येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदम, महामंडळाचे काही तत्कालीन संचालक आणि बड्या अधिकाऱ्यांची नावे या आरोपपत्रात आहेत. कदम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संगनमताने कट करून महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट लावली, असा आरोप त्यात ठेवण्यात आला आहे. हा महाघोटाळा ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे समोर आणला होता. या प्रकरणी कदम गजाआड आहे.महामंडळावर असलेल्या शासकीय संचालकांशी कदम आणि महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक एस.के. बावणे आणि संतोष इंगळे यांनी संगनमत केले आणि घोटाळ्यांचा पद्धतशीर कटच रचला होता, असे सीआयडीने म्हटले आहे. आपल्याशी संबंधित संस्थांना महामंडळाचे कोट्यवधी रुपये देण्याच्या उद्देशाने कदम अॅण्ड कंपनीने महामंडळात ठराव करून घेतले. त्या आधारे कोट्यवधी रुपये वळविण्यात आले. हा कट करणाऱ्यांमध्ये स्वत: कदम, जयेश जोशी, कमलाकर ताकवाले, रामेश्वर गाडेकर, वैशाली मुदळे, हर्षदा बेंद्रे, नकुसा कदम, लक्ष्मीबाई लोखंडे, उमेश कदम आणि शासकीय संचालक सामील होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. निकटवर्तीयांना दिलेल्या नोकऱ्यांचा पर्दाफाशही करण्यात आला आहे.
कदम व इतरांनी कट करून लुबाडले
By admin | Published: November 15, 2015 3:01 AM