लक्ष्मण मोरेपुणे : ग्रामीण भागातील पोलीस नागरिकांशी कसे वागतात, त्यांच्या तक्रारी घेतात की नाही, शिस्तीचे पालन करतात की नाही हे तपासण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पोलीस ठाण्यांमध्ये चक्क ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. महिला पोलीस अधिकारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना तक्रारदार म्हणून पोलीस ठाण्यात पाठवून त्यांना कशाप्रकारे वागणूक देतात याची पडताळणी करुन व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले. तक्रारदारांशी उद्धटपणे वर्तन करणारे पाच पोलीस कर्मचारी मागील दोन महिन्यात निलंबित झाले आहेत.नागरिकांकडून अनेकदा पोलिसांविषयी तक्रारी केल्या जातात. उद्धट वागणूक, तक्रारीच घेतल्या जात नाहीत, पैसे मागितले अशा एक ना अनेक तक्रारी ऐकायला मिळतात. पोलीस दलाची प्रतिमा सुधारावी आणि तक्रारदारांना न्यायमिळावा याचबरोबर प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती मिळावीयासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि अधीक्षक सुवेझहक यांनी चक्क ‘स्टिंग आॅपरेशन’ करण्याचे ठरविले. त्यानुसार,दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्याबाहेरील पोलीस अधिकारी आणिकर्मचाºयांना बोलाविण्यात आले. त्यांना साध्या वेशात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाठविण्यात आले. मोबाईल हरविल्याच, कोणी माणूस हरविल्याची, चोरीची किंवा कोणी छेडछाडीची तक्रार घेऊन गेले.या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर पोलिसांकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो हे तपासण्यात आले. बहुतांश पोलिसांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. उद्धटपणाने उत्तरे दिली त्यांना मात्र कारवाईला सामोरे जावे लागले आहे. दोन महिन्यात विविध पथकांच्या माध्यमातून ही तपासणी केलीजात आहे. यामध्ये काही स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयांचीही मदत घेतली जात आहे.नुकतीच पुण्यातील काही महाविद्यालयांमधून तरुणींना घेऊन ही तपासणी करण्यात आली.या तरुणींकडे रेकॉर्डिंग मशीनही देण्यात आले होते. पोलिसांचे वर्तन, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचा प्रतिसाद याचे रेकॉर्डिंग केले जात आहे. गुरुवारीही पुण्यातील महाविद्यालयीन तरुणींनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन तक्रारी दिल्या.>पोलिसांची दक्षता पथके : जिल्ह्यासाठी अभिनव प्रयोगपोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पोलीस दलातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणखी एक वेगळा प्रयोग राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये ‘नेमके’ काय चालले आहे याचा शोध घेण्यासाठी तीन-चार पथके नेमण्यात आलेली आहेत.उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी या पथकांमध्ये नेमण्यात आलेले आहेत. ही पथके वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये जाऊन साध्या वेशात लोकांशी संवादसाधतात. त्यांच्याकडून पोलिसांच्या कामाविषयी माहिती घेतात. कधी रिक्षामध्ये बसून एवढे जास्त माणसे का भरली हप्ते देता का, अशीही चौकशी करून वास्तव समोर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.काही तरुणींनी गाडी बंद पडल्याची तक्रार करून पोलीस मदत करतात का याची पडताळणी केली. तर काही जणींनी मोबाईल हरविल्याची तक्रार केली. छेडछाडीसंदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयोगासाठी अधीक्षक हक यांनी एका महिला उपअधीक्षक अधिकाºयाची नेमणूक केली आहे. जिल्ह्यात पोलिसांमध्ये शिस्तीचा दरारा निर्माण झाला आहे. कर्तव्यात कसूर करणाºया पाच ते सहा पोलिसांवर आतापर्यंत कारवाई झाल्याने ग्रामीण पोलीस दलात शिस्त मोडल्यास अंगाशी येते हा संदेश गेला आहे. त्याचा परिणाम पोलिसांच्या कामावर झाला असून नागरिकांना जलद आणि योग्य सेवा मिळू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अधीक्षकांमार्फत राबविण्यात येत असलेल्या या ‘आॅपरेशन पोलीस ठाणे’मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिसांकडून न्याय मिळू लागल्याचे दिसत आहे.
थेट पोलीस अधीक्षकांकडूनच स्टिंग आॅपरेशन, महिला अधिकारी, महाविद्यालयीन तरुणींना पाठविले पोलीस ठाण्यांत तक्रारदार म्हणून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:52 PM