- अनिरुद्ध पाटील, बोर्डीमुंबईपासून सुमारे १३५ किमी अंतरावरील ६० क्रमांकाच्या रेल्वे गेटनजीक अप मार्गावरील रुळाला सोमवारी सकाळी ५.३० वाजता तडा गेला. त्याची माहिती तत्परतेने गेटमन जवाहर सिंग यांनी घोलवड स्टेशनला दिल्याने या मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही सेवा बंद करण्यात आल्या. लगेचच दुरु स्तीचे काम हाती घेतल्यानंतर सकाळी सव्वा सातच्या सुमारास धिम्या गतीने वाहतूक सुरू झाली. यामुळे प्रवासी व चाकरमान्यांची प्रचंड कोंडी झाली. रेल्वेच्या डिव्हिजनल इंजिनीअरने रुळाला तडा गेला नसून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबली असा वेगळाच खुलासा केल्याने नेमके झाले काय? याबद्दल संभ्रमाचे चित्र होते. यामुळे डहाणू रोड आणि घोलवड स्थानकांदरम्यान अनेक पॅसेंजर, शटल आणि एक्स्प्रेस कोणतीही सूचना न देता, सुमारे दोन तास थांबविण्यात आल्या होत्या. परिस्थितीची माहिती घेण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी नजीकच्या घोलवड आणि डहाणू रोड रेल्वे स्थानकांत फोन केला. पण फक्त फोनची रिंग वाजत राहिली, समोरून प्रतिसाद आला नाही.
घोलवडनजीक रुळाला तडा
By admin | Published: October 25, 2016 2:29 AM