ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - एकीकडे सोन्याच्या किंमतीत प्रतितोळा 4 हजार रुपयांनी वाढ झालेली असताना, दुसरीकडे शेअर बाजार मात्र गडगडले आहे. शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळते आहे. शेअर बाजारात 1600 अंकांनी घसरण झाली आहे. त्यामुळे मार्केट कोणत्याही क्षणी क्रॅश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याची दिसत आहे.
सोने महागले
तर मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज सकाळी सोन्याच्या दरातदेखील वाढ झालेली दिसत आहे.
गेले काही दिवस 30 हजार रुपयांपर्यंत मिळणा-या सोन्याची किंमत आता एका तोळ्यासाठी 34 हजार रुपये झाली असून आगामी काळात हाच दर 38हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.