मुंबई : राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणा:या महिला प्रवाशांचे सामान चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच चोराने पुन्हा एकदा याच ट्रेनमध्ये हातसफाई केली आहे. मात्र या वेळी सर्वसामान्य प्रवाशाच्या सामानावर डल्ला न मारता मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांच्या पत्नीच्या पर्सवरच डल्ला मारला आहे. त्या ज्या डब्यातून प्रवास करत होत्या त्याच डब्यातून पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी जवानांसह प्रवास करीत होते. त्यांच्या देखत चोराने हा डल्ला मारल्याने चर्चा रंगली आहे.
गुरुवारी मुंबईकडे येणा:या राजधानी एक्स्प्रेसध्ये दोन महिला प्रवाशांचे सामान मद्यधुंद टीसीच्या अकार्यक्षमतेमुळे चोरीला गेले. ही घटना ताजी असतानाच मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी राजधानी एक्स्प्रेसचा सेकंड एसी डबा असलेल्या ए-3मध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांच्या पत्नी प्रीती सूद प्रवास करीत होत्या. त्याच डब्यातून आणि त्याच्या जवळच्याच बर्थमध्ये पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी आनंद झा आणि त्यांचे जवान प्रवास करीत होते. राजधानी एक्स्प्रेस कोटा स्थानकाजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास आली असता झोपेतून जाग्या झालेल्या प्रीती सूद यांनी डोक्याजवळ ठेवलेली पर्स शोधली. मात्र पर्स जागेवर नसल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड केली. जवळच्याच आसनावरील सुरक्षा अधिकारी आणि जवान तसेच प्रवासी धावत आले. पर्स चोरीला गेल्याचे त्यांनी सांगताच रेल्वे सुरक्षा दलाने त्याची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. अखेर प्रीती सूद यांची पर्स ट्रेनच्या बाथरुममध्ये सापडली. त्यावेळी पर्समधून दहा हजार रोख रक्कम आणि सोन्याच्या बांगडय़ा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)
च्दिल्ली रेल्वे स्थानकाच्या जीआरपीच्या सहायक उपनिरीक्षक जमुनादेवी यांनी केस नंबर 00513/14 असून आयपीसी सेक्शन 379 नुसार आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे.
च्गुरुवारी राजधानी एक्स्प्रेसच्या ए-3 याच डब्यात दोन महिला प्रवाशांच्या सामानाची चोरी झाली होती. त्याच डब्यातून प्रवास करीत असलेल्या प्रीती सूद यांचे सामानही चोराने लंपास केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रीती सूद या मध्य रेल्वेच्या वुमन्स सोशल सर्विस कमिटीच्या अध्यक्षाही आहेत.