खामगाव : चोरीला गेलेल्या गाईची कत्तल करणार्या तिघांना घटनास्थळी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३0 च्या सुमारास स्थानिक शौकत कॉलनी भागात घडली. गायमालकाने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक बर्डे प्लॉट भागातील अजयसिंह राजहंससिंह ठाकूर (३२) यांची गाय बेपत्ता झाली होती. त्यांनी पाहणी केल्यानंतरही गाय आढळून आली नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी ६.३0 च्या सुमारास याच भागातील शेख ईसा शे. बिस्मिल्ला, शे. युसूफ शे. ईसा व शेख इसार शे. इसा हे तिघे कॉलनीतून सायकलीवर पोत्यात काही तरी नेताना आढळले. त्यांची तपासणी केली असता, पोत्यामध्ये अजयसिंह यांच्या मालकीच्या गाईचे कातडे व मांस आढळून आले. याबाबतची तक्रार अजयसिंह ठाकूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीची दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर नजीर शेख, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक वसुरकर यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. सकाळी ९.३0 वाजता त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ४२९, ३४ सह कलम ५ सी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधि. १९९५ चे (संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा २0१५) कलम ११ प्राण्यांना निर्दयतेने वागवणे (प्रतिबंध) कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.
चोरीला गेलेल्या गाईची कत्तल
By admin | Published: June 17, 2015 1:54 AM