औसा (जि. लातूर) : भुईकोट किल्ल्यातील पंचधातूच्या तोफेची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. शनिवार रात्री ही घटना घडली. ही तोफ सुमारे ५० किलो वजनाची असून याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.ख्वाजा मेहमूदने १३८२मध्ये औश्याच्या भूईकोट किल्ला बांधला. पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ३४ एकर ३० गुंठे जमिनीवर असलेल्या या किल्ल्याची तीन-चार वर्षांपासून डागडुजी करण्यात येत आहे. शनिवारी रात्री व रविवारी पहाटेच्या सुमारास या भुईकोट किल्ल्याच्या दिंडी दरवाज्याचे कुलूप व कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी किल्ल्यात प्रवेश केला आणि साडेतीन फूट लांब, ८.८ इंच व्यास असलेली व ५० किलो वजनाची पंचधातूच्या तोफेची चोरी केली़ (प्रतिनिधी)किंमत दहा हजार औश्याच्या भूईकोट किल्ल्यातील चोरीस गेलेली ही तोफ पंचधातूची आहे़ मात्र, औसा पोलिसांत त्याची किंमत दहा हजार रुपये असल्याची नोंद करण्यात आली आहे़
भुईकोट किल्ल्यातील पंचधातूंची तोफ चोरीस
By admin | Published: July 12, 2016 3:56 AM