नवी मुंबई : महापालिकेने शहरातील अपंग नागरिकांना वितरीत केलेल्या स्टॉलवर कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाने कारवाई तत्काळ थांबवावी अशा सूचना स्थायी समिती सभापतींनी प्रशासनास केल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने अपंग नागरिकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी विविध स्टॉल्सचे वितरण केले आहे. परंतु स्टॉलचालकांनी भाडे भरले नसल्यामुळे त्यांचे स्टॉल्स ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे. प्रशासनाच्यावतीने सुरू केलेल्या कारवाईविषयी सभापती शिवराम पाटील यांनी स्थायी समितीमध्ये नाराजी व्यक्त केली. अपंगांवर अशाप्रकारे तत्काळ कारवाई करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सांगितले की, अपंगांवर कोणत्याही प्रकारे आकसाने कारवाई केलेली नाही. जवळपास एक वर्षापासून त्यांनी भाडे भरावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)>ज्यांनी भाडे भरले नाही त्यांना दोन ते तीन नोटीस दिल्या आहेत. वर्तमानत्रांमधूनही सूचना दिल्या आहेत. अनेकांनी भाडे भरले आहे, परंतु ज्यांनी भाडे भरले नाही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. कारवाई न करता त्यांना पुन्हा १५ दिवसांची मुदत दिली जात असल्याचेही अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी सांगितले.
अपंग स्टॉलवरील कारवाई थांबवा
By admin | Published: August 27, 2016 2:19 AM