मुंबई : संशोधनाच्या क्षेत्रातील ज्ञानाचे भांडार आणि नवनवीन प्रकल्प सर्वांना खुले व्हावेत तसेच वाङ्मयचौर्यावर निर्बंध लागावेत म्हणून मुंबई विद्यापीठ पुढाकार घेत आहे. यासाठी एक विशेष सॉफ्टवेअर खरेदी करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या प्रबंधाची छाननी करण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.भारतीय संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाङ्मयचौर्याच्या घटना घडतात. विविध प्रबंध स्वत:च्या नावावर खपविण्याच्या प्रवृत्तीमुळे संशोधन क्षेत्राचा दर्जाही खालावला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) ‘शोधगंगा’ प्रकल्प यावर उपाय ठरणार आहे. संकेतस्थळावर अपलोड केल्या जाणाऱ्या प्रबंधांची एका विशेष सॉफ्टवेअरमध्ये छाननी केले जाणार आहेत. प्रबंधातील काही भाग कॉपी केलेला असल्यास त्याची माहिती तात्काळ संबंधित तज्ज्ञांना कळेल. कॉपीराइट कायद्याचा भंग केला असल्यास तशी नोंद केली जाईल. सॉफ्टवेअरने हिरवा कंदील दिल्यानंतर त्याचा प्रबंध स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात कॉपी-पेस्ट करून पीएच.डी. मिळवणाऱ्यांवर चाप बसेल.यूजीसीच्या ‘शोधगंगा’ आणि ‘शोधगंगोत्री’ या नव्या प्रकल्पांमुळे संशोधकांसाठी माहितीचे खूप महत्त्वाचे संदर्भस्रोत खुले झाले आहेत. पीएच.डी.साठी नोंदणी करताना संशोधन आराखडा कसा असावा, प्रबंध कसा लिहावा, इतरांचे प्रबंध कोठे पाहावेत इत्यादी अनेक प्रश्नांबाबत संशोधक विद्यार्थ्यांना समस्या जाणवतात. यूजीसीच्या या नव्या प्रकल्पांनी ही समस्या सोडवली आहे. या प्रकल्पात संशोधनाचे लघुप्रबंध, प्रबंध ६६६.२ँङ्मँिँल्लँ.कल्ला’्रुल्ली३.ंू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध केले जात आहेत. (प्रतिनिधी)
वाङ्मय चोरीला बसणार आळा!
By admin | Published: November 06, 2014 4:05 AM