शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
4
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
5
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
6
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
7
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
8
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
9
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
10
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
11
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
12
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
13
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
14
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
15
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
16
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
17
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
18
कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन
19
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."
20
सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!

इमानसाठीचे ‘क्राउड फंडिंग’ कॅम्पेन थांबविले

By admin | Published: April 27, 2017 12:17 AM

जगातील सर्वांत लठ्ठ अशी ओळख असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमदचे वजन आता ५००हून १७१ वर आले आहे. मात्र, १४ एप्रिल रोजी

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ अशी ओळख असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमदचे वजन आता ५००हून १७१ वर आले आहे. मात्र, १४ एप्रिल रोजी इमानची बहीण शायमा यांनी डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. आता इमानवरील उपचारांच्या वाद-प्रतिवादानंतर तिच्यासाठी इंटरनेटवर सुरू करण्यात आलेले क्राउड फंडिंग कॅम्पेन थांबविण्यात आले आहे. मुंबईनंतर आता पुढील उपचारांसाठी इमान अबुधाबीला रवाना होण्याची शक्यता आहे.‘सेव्ह इमान’ या शीषकांतर्गत सुरू करण्यात आलेले क्राउड फंडिंग कॅम्पेन १९ एप्रिल रोजी थांबविण्यात आले. या कॅम्पेनच्या माध्यमातून २१ लाख १४ हजार २१७ एवढा निधी उभा करण्यात आला. या कॅम्पेनला जगभरातील २०८ व्यक्तींनी पाठिंबा दर्शवला होता. मंगळवारी इमानचे सिटीस्कॅन करण्यात आले. त्यानंतर, आता त्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.मुंबईतील उपचारांनतर आता भविष्यातील उपचारांसाठी इमान अबुधाबीला जाण्याची शक्यता आहे. यासाठी अबुधाबी येथील ‘व्हीपीएस हेल्थकेअर’च्या डॉक्टरांनी बुधवारी सैफी रुग्णालयातील डॉक्टरांशी इमानच्या तब्येतीविषयी चर्चा केली. इमानची बहीण शायमा यांनी सांगितले की, अबुधाबी येथील ‘व्हीपीएस हेल्थकेअर’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक शमशीर वायलिल यांनी यापूर्वी इमानच्या उपचारांसाठी संपर्क साधला होता. याविषयी, सैफी रुग्णालयाच्या डॉ.अर्पणा भास्कर यांनी सांगितले की, इमानच्या वैद्यकीय स्थितीची संपूर्ण माहिती व्हीपीएसच्या चमूला देण्यात येईल. शिवाय त्यानंतर इमानची भेटसुद्धा घडविण्यात येईल. (प्रतिनिधी)