कल्याण : सुधींद्र कुळकर्णींना काळे फासले, पण त्यांचा प्रकाशनाचा कार्यक्रम थाटात झाला. काळे फासून काय मिळाले? त्याऐवजी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कानफटात मारायला हवी होती. पाकिस्तानच्या प्रश्नावरून अशी छोटीमोठी आंदोलने करण्यापेक्षा अटलजींच्या काळात सुरू झालेली समझोता एक्स्प्रेस बंद करा, साद-ए-सरहद्द ही लाहोर-दिल्ली बससेवा बंद करा. कारण, त्या माध्यमातून हजारो पाकिस्तानी येथे येत आहेत, पण जाताना दिसत नाहीत. आपण केंद्रात सत्तेत आहात ना? हे जर करता येत नसेल तर सत्ता सोडा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला कल्याण पूर्व येथील जाहीर सभेत बोलताना दिला.मनसेच्या आमराई येथे पार पडलेल्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. कल्याण-डोंबिवलीला ३५०० कोटींचे पॅकेज कसे काय जाहीर करता? ज्या गोष्टी बोलून मते मिळवली आणि सत्ता हाती येताच आम्ही अच्छे दिन आएंगे, असे बोललोच नाही, असे त्यांचे नेते म्हणतात. सरकार बदलले म्हणतात. थोबाडे तिच आहेत. सरकार नवीन येऊन काहीच उपयोग झाला नाही. डाळींपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले, मग अच्छे दिन कोठे आले, असा सवाल त्यांनी केला.
समझोता एक्सप्रेस बंद करून दाखवा
By admin | Published: October 26, 2015 2:47 AM