शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बोईसर, पालघरमध्ये कडकडीत बंद

By admin | Published: July 13, 2017 5:14 AM

अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ बुधवारी बोईसर व पालघरमध्ये उस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ बुधवारी बोईसर व पालघरमध्ये उस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामध्ये रिक्षा, हॉटेल्स, व्यापारी, व्यावसायिक सहभागी होते. एस.टी सुरु असल्याने प्रवशांना दिलासा मिळाला मात्र असंख्य कामगारांना वेळेवर कारखान्यात पोहोचता न आल्याने उद्योगांवर परिणाम झाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी सकाळी बोईसर रेल्वे स्थानकाच्या आवारात जमून हल्ल्यात मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा राज्याचे प्रमुख प्रचारक शंकर गायकर , पालघर जिल्हा संयोजक चंदन सिंह , मनदेव दुबे, यांच्या सह पालघर जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन सभापती अशोक वडे, पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील, माजी पं स सदस्य भावेश मोरे, भाजपाचे संजीव शेट्टी यांच्यासह सुमारे १५० नागरिक उपस्थित होते. डहाणूतील दोन भविकांना डहाणूकरांनी स्बोर्डी, घोलवड आणि परिसरातील नागरिकांनी विजयस्तंभ येथे एकत्र येऊन मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली. तर डहाणू शहरातील विविध भागात उषा सोनकर आणि निर्मलादेवी ठाकूर यांचे फोटो असलेले बॅनर लावून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बोईसरचे पोलीस उपविभागीय अधिकारी फत्तेसिंह पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक विजय शिंदे तारापूर व वाणगांवचे सहाय्यक निरीक्षक गोंडुराम बांगर व दीपक जोगदंड उपस्थित होते. मात्र अचानक पुकारलेल्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. >पालघरमध्ये बंदला गालबोट : हा बंद सर्वपक्षीय बंद होता. त्याचे मेसेज व बॅनर शहरात मंगळवार संध्याकाळपासून दिसू लागल्यानंतर पालघर शहरातील सर्वांनी बुधवारी सकाळपासून आपली दुकाने बंद ठेवली. औषधाची दुकाने, बँका व शासकीय कार्यालये सोडली तर सर्वत्र बंद होता. शहरात सकाळी हुतात्मा स्तंभाजवळ भाजपा व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बळी गेलेल्या दोन्ही यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र अचानक चिनी मालावर बंदी घालण्याच्या घोषणाही केलेल्या गेल्या. पाहता-पाहता यातील काही कार्यकर्त्यांनी स्तंभाजवळ बंद असलेल्या मोबाइल दुकानाच्या व देविशा दुकानाच्या फलकावर दगडफेक करून ते तोडले. >जखमींची प्रकृती स्थिरडहाणू : दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या अमरनाथ यात्रेकरूंची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होत आहेत. यशवंत डोंगरे, योगिता डोंगरे (कासा), प्रकाश वजाणी, हेमा वजाणी, पूजा गोसावी, छाया वसंत मेहेर, गीताबेन रावल, पल्लवी अभ्यंकर (सर्व डहाणूचे) यांची प्रकृती स्थिर आहे. पूजा गोसावी यांच्या कमरेत गोळी शिरल्याने त्यांच्यावर श्रीनगर येथील मिलिट्रीच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन-तीन दिवसांत त्या येथे परततील असे त्यांचे पती दिनेश गोसावी यांनी सांगितले. गीताबेन रावल यांच्या पायाला गोळी लागली असून त्या सध्या त्या येथील डॉ. देव यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जखमी दांपत्य यशवंत डोंगरे आणि सौ. योगिता डोंगरे यांच्यावर सुरत येथे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असून आमदार अमित घोडा यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन विचारपूस केली.>गीताबेन यांची आपबितीसोमवारी रात्री ८ च्या सुमारास वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. येथे शेषनाग येथे बाजारात गाडी उभी होती. अचानक गोळीबार सुरू झाला. आम्हाला असे वाटले की फटाके फुटत आहेत. परंतू आजूबाजूच्या लोकांच्या शरीरावर रक्त पाहिले तेव्हा लक्षात आले आपल्याच गाडीवर गोळीबार सुरु आहे. आम्ही सीटखाली लपलो. अतिरेक्यांनी बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना आत शिरता आले नाही. अन्यथा संपूूर्ण बसमध्ये रक्तपात घडला असता. माझ्या पायातून रक्त वाहू लागल्यानंतर मला जाणवले की गोळी लागली आहे, अशी थरारक कहाणी गीताबेन यांनी सांगितली.