कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे चालू असलेले चो-यांचे सत्र तसेच झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत असल्याच्या निषेधार्थ व्यापारी व ग्रामस्थांच्यावतीने शुक्रवारी नेवासा-शेवगाव मार्गावर कुकाणा बसथांबा परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.भाजपाचे तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे, कुकाण्याचे सरपंच दौलतराव देशमुख, माजी सरपंच एकनाथ कावरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी गर्जे, किरण शिंदे, पत्रकार बाळासाहेब सरोदे यांची भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणातून पोलिसांविरुध्द तक्रारींचा पाढा वाचला. गेल्या आठवड्यापासून कुकाण्यात चोऱ्यांचे सत्र चालू आहे. झालेल्या चोऱ्यांचा तपास लागत नाही. कुकाणा दूरक्षेत्रात तक्रार नोंदवून घेण्यात यावी, अशी मागणी दिनकर गर्जे यांनी करुन या चोऱ्यांचा तात्काळ तपास न लावल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला. (वार्ताहर)
कुकाण्यात रास्ता रोको
By admin | Published: August 29, 2014 11:32 PM