मुंबई- सोमवारपासून (१८ जुलै) सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी विरोधकांनी केली आहे. पूरक पोषण आहारासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल, फळ-भाजीपाला नियमनमुक्तीवरून उठलेला बाजार, शेतकऱ्यांबाबत सरकारी अनास्था, डाळ घोटाळा आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे, या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत. तर पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर झालेले आरोप हे मुद्दे उपस्थित करून विरोधकांना नामोहरण करण्याची व्यूहरचना सत्ताधाऱ्यांची आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
अधिवेशनावर वादळी ढग!
By admin | Published: July 18, 2016 5:28 AM