शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
6
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
7
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
8
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
9
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
10
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
11
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
13
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
14
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
15
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
16
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
17
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
18
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
19
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
20
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार

कथा एका दुर्मीळ रक्तदात्याची...!

By admin | Published: April 08, 2017 11:18 PM

माणुसकीची आणि मदतीची भावना एखाद्याच्या रक्तातच असावी लागते, असे म्हणतात. दुर्मीळ रक्तगटाचा एक दाता स्वत:च्या जिवापेक्षाही दुसऱ्याच्या जिवाचा विचार करत

- अविनाश कोळी,  सांगली

माणुसकीची आणि मदतीची भावना एखाद्याच्या रक्तातच असावी लागते, असे म्हणतात. दुर्मीळ रक्तगटाचा एक दाता स्वत:च्या जिवापेक्षाही दुसऱ्याच्या जिवाचा विचार करत, दररोज अंगातील रक्तासारखाच धावतो आहे. ‘बॉम्बे ओ’ रक्तगटाचे रक्त देऊन त्याने तब्बल ४२ जणांचे प्राण वाचविले आहेत. विक्रम यादव असे त्याचे नाव. तासगाव (जि. सांगली) येथील बेताचीच परिस्थिती असलेल्या कुटुंबातील हा कर्ता पुरुष. भिलवडी स्टेशनवरील चितळे डेअरीमध्ये वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या विक्रमने पदरमोड करून लोकांना जीवनदान दिले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी रत्नागिरीतील एका बाळ-बाळंतिणीला वाचविले. करबुडे गावात चिरेखाणीवर काम करणाऱ्या व जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी २ एप्रिलला दाखल झालेल्या अंजली सचिन हेळकर (रा. मूळ सोलापूर) या महिलेच्या रक्तात हिमोग्लोबिन अत्यंत कमी आढळले. तिच्यात असा ‘बॉम्बे ओ’ हा अत्यंत दुर्मीळ रक्तगट आढळून आला. या गटाचे रक्तच उपलब्ध नसल्याने दात्यापर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न होता. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर यांनी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून रक्तदात्यांना आवाहन केले. या आवाहनाला सर्वात पहिला प्रतिसाद तासगावच्या विक्रम यादव यांनी दिला. त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.विक्रम यादव यांनी महाराष्ट्र व अन्य राज्यांतील या दुर्मीळ गटातील लोकांचा गट स्थापन केला आहे. रत्नागिरी, नांदेड, नाशिक, मुंबई या जिल्ह्यासह अगदी मलेशिया, कोलंबिया अशा परदेशातील रुग्णांनाही त्यांनी हा रक्तगट पोहोचवून, मदतीचा हात दिला आहे. ‘बॉम्बे ओ’ हा रक्तगट असलेल्या लोकांचा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप बनवून यादव यांनी दुर्मीळ सेतू तयार केला आहे. २३० लोक या ग्रुपमध्ये आहेत. महाराष्ट्रातील ६० ते ६५ जणांचा त्यात समावेश आहे. म्हणून धावतात विक्रम...ही घटना आहे १९९५ मधील. एका अपघातात विक्रम यादव यांचा जवळचा मित्र जीवन-मरणाच्या कुंपणावर अडकला होता. त्याचा रक्तगटही ‘बॉम्बे ओ’ होता. मात्र, त्या वेळी त्यांना त्यांच्या रक्तगटाची कल्पना नव्हती. रक्ताअभावी या मित्राचा मृत्यू झाला. त्यानंतर, काही महिन्यांनी आणखी एका मित्राच्या आईला रक्त देण्यासाठी विक्रम मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्या वेळी तेथील डॉक्टरनी विक्रम यांचा रक्तगट ‘बॉम्बे ओ’ असल्याचे सांगितले आणि त्यांचे डोळे पाणावले. काही दिवसांपूर्वी ही गोष्ट कळाली असती, तर मित्राचे प्राण वाचले असते, याची जाणीव त्यांना झाली. हे शल्य आजही त्यांना बोचते आहे. या दिवंगत मित्राला आदरांजली म्हणून विक्रम दुसऱ्याच्या जिवासाठी आता सतत धावत असतात. प्रत्येक जीव वाचवल्यानंतर ते त्या मित्राला आदरांजली अर्पण करतात. काय आहे ‘बॉम्बे ओ’?बॉम्बे ब्लड ग्रुपला ‘ओएच’ म्हणूनही ओळखले जाते. या रक्तगटाचा शोध १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे या डॉक्टरांनी मुंबईमध्ये लावला. आपण समजतो की, ‘ओ निगेटिव्ह’ हा रक्तगट दुर्मीळ असतो, पण त्याच्यापेक्षाही ‘बॉम्बे ब्लड’ ग्रुप दुर्मीळ मानला जातो. यामध्ये असणारा ‘अँटीजन एच’ हा घटक, हे दुर्मीळ असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हा घटक अन्य रक्तगटात आढळत नाही. दर दहा लाख लोकांच्या मागे केवळ चार जण या रक्तगटाचे सापडतात.