भोर, दि. 27 - पुणे- सातारा महामार्गावर रविवचारी दुपारी एक विचित्र अपघात झाला. भोरला जाणा-या एसटीला मागून कंटेनरने धडक दिली. त्यामुळे एसटी समोरच्या कार आणि दुचाकीला धडकली. यामध्ये 22 प्रवासी जखमी झाले असून पाच ते सहा जण गंभीर आहेत.
दुपारी स्वारगेटहून 1 वाजता भोरला जाणारी एसटी (एमएच 12, 1678) जुन्या कात्रज घाटातून शिंदवाडी व वेळू गाचाच्या दरम्यान जात असनाता पाठीमागून येणा-या कंटेरनरने तिला धडक दिली. त्यामुळे एसटी चालकाचे नियंत्रण सुटून तिने समोर असलेल्या कार व दुचाकीला ठोकले. या अपघातात एसटी, कंटेनेरसह दुचाकी व कार या दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातात 22 प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक आंदाज असून खेड शिवापूर येथील श्रेयस रूग्णालयात 9 तर श्र्लोक रूग्णालयात 13 जणांवर उपचार सुरू आहेत.