शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

‘आधीच्या’ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची रणनीती! फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार सत्ताधारी बाहेर काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:14 AM

सध्या किरीट सोमय्यांच्या रडारवर असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बाबतचे सूतोवाच सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले.

यदु जोशी -मुंबई : भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील एकेका मंत्र्यांविरुद्ध आरोपांची राळ उठविली असताना आता ठोशास ठोसा उत्तर देण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारमधील कथित घोटाळे बाहेर काढले जातील, अशी शक्यता आहे.सध्या किरीट सोमय्यांच्या रडारवर असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बाबतचे सूतोवाच सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले. चंद्रकांत पाटील बांधकाम मंत्री असताना हायब्रीड एनयूटीचा मोठा घोटाळा झाला. इतरही घोटाळे झाले. आता आम्हालाही त्यांचे घोटाळे बाहेर काढावे लागतील. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना मी हे सांगितले आहे. शांत बसून चालणार नाही. आपल्या सगळ्यांवरच असे आरोप सुरू राहतील. अशावेळी लोकशाही मार्गाने आपल्यालाही आधीची प्रकरणे बाहेर काढावी लागतील, ही हसन मुश्रीफ यांची विधाने या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहेत.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आदेश जुलै २०२१ मध्येच महाविकास आघाडी सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिले होते व ती चौकशी सुरू आहे. फडणवीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार हे वन मंत्री होते आणि त्यांनी ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असल्याने विधिमंडळ सदस्यांची एक समिती या तक्रारींची चौकशी सध्या करीत आहे.  राज्यमंत्री दत्ता भरणे हे या समितीचे प्रमुख आहेत. सुरू असलेल्या चौकशांना गती देऊन त्यावर कारवाई करणे आणि जुनी काही प्रकरणे समोर आणणे अशी खेळी महाविकास आघाडीकडून खेळली जाऊ शकते.

विधानसभा अध्यक्ष निवडीचे नियम बदलणार?- विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाने करण्याचा सध्याचा नियम बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधानसभा नियम समितीची बैठक २२ सप्टेंबरला मुंबईत होत असून त्यात या संबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे. समितीमध्ये महाविकास आघाडीचे ७ तर भाजपचे संदीप धुर्वे, जयकुमार गोरे आणि सुधीर गाडगीळ हे तीन सदस्य आहेत. भाजपचे चौथे सदस्य गिरीश महाजन निलंबित आहेत.- विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने व्हावी असा नियम केल्यास अध्यक्षांची निवड महाविकास आघाडीसाठी सोपी होणार आहे. त्या दृष्टीनेच हालचाली सुरू आहेत. 

फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे एक माजी मंत्री सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्यांच्यावर एका आर्थिक घोटाळ्यात कारवाईचा फास आवळला जाऊ शकतो. आणखी एका मोठ्या विषयाचे पुरावे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने तयार ठेवल्याचीही माहिती आहे. ‘बदला घेण्याचे राजकारण खेळायचे नाही’ या भूमिकेतून आम्ही शांत होतो, पण आता विचार करावा लागेल, असे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी लोकमतला सांगितले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस