परळी : विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुुंडे यांच्या वाहनावर सोमवारी दुपारी १२ वाजता भगवानगड येथे दगडफेक झाल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद येथे उमटले. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि परळीत बंद पाळण्यात आला़ विरोधीपक्षनेतेपदी वर्णी लागल्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच श्री क्षेत्र भगवानगड येथे गेले होते. तेथे त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली. मुंडे समर्थकांनी घटनेचा निषेध नोंदवत याप्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली. परळी शहरातील बसस्थानक, वैद्यनाथ मंदिर परिसर, नाथरोड, स्थानक परिसरातील दुकाने अवघ्या काही क्षणांमध्ये बंद झाले. त्यामुळे परळी शहरासह अतिसंवेदनशील गावांत बंदोबस्त वाढविण्यात आला. (प्रतिनिधी)
परळीत कडकडीत बंद
By admin | Published: January 06, 2015 2:02 AM