मुंबई - बहुप्रतीक्षेत भाडेकरारावरील शयनयान (स्लीपर) शिवशाहीची बांधणी पूर्ण झाली असून, त्वरित शिवशाही ताब्यात घेऊन प्रवासी वाहतूक सुुरू करण्याचे आदेश महामंडळाने संबंधित विभागांना दिले. मुंबईसह पुणे,औरंगाबाद आणि धुळे विभागाला परिपत्रकातून हे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील १० शिवशाही बस महामंडळाच्या ताफ्यासह ८ एप्रिलपर्यंत धावणार आहेत.एसटीने पाच मार्गांवर प्रत्येकी दोन शयनयान (स्लीपर) शिवशाही बस संबंधित विभागाला दिले आहेत. यानुसार, मुंबई-पणजी, पुणे-पणजी, औरंगाबाद-पणजी, निगडी (पुणे)-बेळगाव आणि शहादा-पुणे या मार्गावर धावणार आहेत.भाडेतत्त्वावरील २ हजार शिवशाही वातानुकूलित बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यापैकी ५०० शिवशाही या एसटी महामंडळाच्या स्वमालकीच्या आहेत. करारात शयनयान शिवशाहीचीदेखील तरतूद करण्यात आली.यानुसार, १० शयनयान शिवशाही येत्या आठवड्यापर्यंत रस्त्यावर धावणार आहेत. सद्यस्थितीत सुमारे ६०० वातानुकूलित बैठे आसन असलेल्या शिवशाही राज्यातील ११५ मार्गांपेक्षा अधिक मार्गावर धावत आहेत.प्रवासी टप्पा एसटी खासगी बस(दरपत्रक (शयनयान (शयनयानरुपयांमध्ये) वातानुकूलित वातानुकूलितशिवशाही) बस)मुंबई-पणजी १२९६ ७५०-९५०पुणे-पणजी ९५९ ३५०-८००औरंगाबाद-पणजी १४१७ १०००-११००निगडी (पुणे)-बेळगाव ७९७ ५००-६९९शहादा-पुणे ९४५ ६१०-७५०राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित शयनयान शिवशाही बस.एसटी शयनयान शिवशाहीचे वैशिष्ट्येच्मोफत वाय-फायच्प्रत्येक प्रवाशाला रजई-उशीच्मोबाइल चार्जरच्प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी२ सीसीटीव्ही कॅमेरेच्२ बाय १ एकूण३० शयनयान आसनेखासगी बसचे आव्हान!मुंबई-पणजी एसटी स्लीपर शिवशाहीच्या प्रवाशांना १ हजार २९६ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई-पणजी खासगी बसचे भाडे ७५०-९५० रुपयांपर्यंत आहे. एसटीच्या शयनयान शिवशाहीचे तिकीटदर खासगी शयनयानपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.गर्दीच्या हंगामात खासगी बसचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे शिवशाहीसमोर खासगी बसचे आव्हान असल्याचे दिसून येते.याच टप्प्यासाठी रेल्वे वातानुकूलित शयनयान तिकीट १ हजार ४५ रुपये आहे. यामुळे महामंडळाच्या प्रतिष्ठित शिवशाहीला प्रवासी नेमका कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एसटीच्या वेगाला ‘स्लीपर’ शिवशाहीचे बळ! पहिल्या टप्प्यात १० बस होणार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 5:17 AM