शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

श्रीरामपूर येथे २ गटात तणाव; जमावाकडून दुकानांची तोडफोड

By admin | Published: May 09, 2016 5:31 AM

श्रीरामपूर येथे रवीवारी रात्री ११:३० च्या सुमारास किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून दोन गटात दंगल भडकली. त्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ व दगडफेक झाली.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ९ : श्रीरामपूर येथे रवीवारी रात्री ११:३० च्या सुमारास किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून दोन गटात दंगल भडकली. त्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ व दगडफेक झाली. नेवासा-संगमनेर रस्त्यावर असलेल्या नेहरु भाजी मार्केट समोरील फळविक्रेत्यांची १० ते १५ दुकाने दंगलखोरांनी पेटवून दिली. त्याचप्रमाणे पुण-तांबा रस्त्यावरील सयद्द बाबा दर्ग्याजवळील केवल किराणा, गौतम किराणा, प्रसाद शॉपसारखी फोडून लुटण्यात आली.तसेच तेथिल काही वाहनांना व इतरही दुकानांना आगी लावण्यात आल्या. शहराच्या प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये घडलेल्या जाळपोळीचे पडसाद शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रोड व इतर परीसरातही उमटले.
 
शिवाजी रोडवर असणाऱ्या २ टपऱ्या दंगेलखोरांनी जाळल्या. सय्यद बाबा दर्गा परीसरात मोठा जमाव जमल्याने आग विजवण्यासाठी आलेल्या अग्निशामक बंबाना विजवण्यासाठी घटनास्थळी जाण्यास अडचणी येत होत्या. 
श्रीरामपुरचे अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव रजेवर आहेत त्यामुळे त्यांचा अतिरिक्त पदभार अहमदनगर येथिल अप्पर पोलीस अधिक्षक  पंकज देशमुख यांच्याकडे आहे. घटनेची माहीती कळताच अहमदनगर येथून देशमुख दंगल नियंत्रक पथक व ज्यादा पालीस फोर्स घेऊन श्रीरामपूरमध्ये दाखल झाले. दरम्यान, श्रीरामपुरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रकाश थवील, तहसीलदार किशेर कदम, पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ आणि उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. रात्री उशीरा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीसांना यश मिळाले.