मुंबई : समाजकंटकांकडून पोलिसांवर हल्ले सुरूच असून कल्याणमध्ये गणेश विर्सजनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या पोलीसाला एकाने मारहाण केली.अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील तुरखेड येथे संशयित आरोपीला समन्स बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसाला एका व्यक्तीने मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. हेडकॉन्स्टेबल आठवले व पोलीस शिपाई सर्वेश कांबे हे तुरखेड येथील संशयित आरोपीला न्यायालयीन समन्स बजावण्यासाठी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गेले होते. यावेळी त्यांनी गजानन काळे (५०) नावाच्या व्यक्तीला समन्स दाखवून संशयित आरोपीचा पत्ता व घर दाखविण्याबाबत सांगितले. तेव्हा काळेने शिपाई कांबे यांना शिवीगाळ करून कानशिलात लगावली. पोलिसांनी काळेला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भादंवि २९४, ५०६ व ३५३ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पंढरपुरात पोलीस कुटुंबियांचा मूक मोर्चापंढरपूर : ‘पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या’, ‘पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांना मदत करा’, अशा प्रकारचे फलक घेऊन राज्यात विविध ठिकाणी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पंढरपूर येथील पोलिसांच्या कुटुंबियांनी सोमवारी मूकमोर्चा काढला़ यामध्ये सेवानिवृत्त पोलीस बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच पोलीस लाईन बॉईज संघटनेचे पदाधिकारी व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते़ यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे, तहसीलदार नागेश पाटील यांना देण्यात आले़
पोलिसांवर हात उगारणे सुरूच !
By admin | Published: September 13, 2016 5:12 AM