नागपूर : राज्यात दुधाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे. शांतपणे आंदोलन करणा-या शेतक-यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. केले असतील तर ते परतही घेतले जातील. मात्र, आंदोलनाआड हिंसाचार करणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी राज्यात दूध उत्पादक शेतकºयांचे आंदोलन सुरू असल्याचे सांगत आंदोलक शेतक-यांवर पोलीस कलम १५१ (३) नुसार स्थानबद्धतेचे गुन्हे दाखल केले जात असल्याचे सांगितले. न्यायासाठी आंदोलन करणा-या शेतक-याला दडपण्याचा प्रकार सुरू असून संबंधित गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही ठिकाणी टँकर जाळले जात आहेत. जाळपोळ करणारे निश्चितच शेतकरी नाहीत.
हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 3:50 AM