पुणे : जिल्ह्यातल्या उद्योग वसाहतींमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत सरकारने कडक पाऊले उचलले आहे. उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय करू नये, त्यांच्यावर मोक्का सारख्या कडक कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस खात्याला दिल्या आहे.
पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातल्या उद्योग वसाहतींमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत ठोस चर्चा झाली.
पुणे परिसरात असणाऱ्या उद्योग वसाहतीमध्ये परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या उद्योजकांना त्रास देणाऱ्या टोळ्या वाढल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना दिल्या.