राज्यात एकीकडे कोरोनाची लाट आटोक्यात आल्यामुळे मंदिरे, मॉल आदी सुरु करण्यात येणार असताना एका जिल्ह्यातून लॉकडाऊनची बातमी येत आहे. दहा पेक्षा जास्त उपराधीन करोना रुग्ण असलेल्या ६१ गावांत १३ ऑक्टोबरपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (strict lockdown in 61 villages of Ahmadnagar district till 13 october.)
अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेश दिले आहेत. सर्वाधिक गावे ही संगमनेर तालुक्यातील असून २४ एवढी संख्या आहे. मेडिकल, दवाखाना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील ही गावे आहेत.