शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

पहिल्या सहामाहीत एसटीची कोटींची उड्डाणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 2:17 AM

एसटी प्रशासनाने तब्बल चार वर्षांनंतर केलेल्या १८ टक्के भाडेवाढीमुळे २०१८च्या पहिल्या सहामाहीत २०१७च्या तुलनेत प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटींनी वाढ झाली आहे.

मुंबई : एसटी प्रशासनाने तब्बल चार वर्षांनंतर केलेल्या १८ टक्के भाडेवाढीमुळे २०१८च्या पहिल्या सहामाहीत २०१७च्या तुलनेत प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटींनी वाढ झाली आहे. २०१४ नंतर एसटी प्रशासनाने थेट जून २०१८ मध्ये प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ केली होती. त्यामुळे एसटीला मोठा नफा कमावता आला आहे.एसटीच्या प्रवासी संख्येत २०१४-१५ या कालावधीत तब्बल ११ कोटी प्रवाशांची घट झाली होती. २०१३-१४ला २५६ कोटी प्रवाशांवरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २४५ कोटींपर्यंत घसरली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या एसटी प्रशासनाने वेगवेगळ्या अभियानांच्या माध्यमातून सलग चार वर्षे प्रवासी टिकविण्यात यश मिळविले आहे. ‘हात दाखवा आणि एसटी थांबवा’, ‘आवडेल तिथे प्रवास’, ‘मोफत वायफाय’ अशा विविध संकल्पनांद्वारे एसटीने खासगी व बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात कंबर कसल्याची प्रतिक्रिया एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.देओल यांनी सांगितले की, दोन मोठ्या गावांसह शहर व गावांना जोडणाºया शटल सेवा सुरू केल्याचा मोठा फायदा एसटीला झाला आहे. यामुळे प्रवाशांना निश्चित सेवेची हमी मिळाली आहे. दरम्यान, वेळापत्रकाचे अचूक पालन केल्याचा फायदा शटल सेवांसह सर्वसामान्य प्रवासी वाहतुकीसाठीही झाला आहे. एसटीसह एसटी स्थानकांवर स्वच्छता ठेवण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान२०१७च्या पहिल्या सहामाहीत एसटी प्रशासनाने साडेतीन हजार कोटींहून कमी कमाई केली होती. याउलट २०१८च्या पहिल्या सहामाहीत प्रशासनाने ३ हजार ७७८ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. दरम्यान, डिझेलच्या दरातील वाढ आणि कामगारांची पगारवाढ यामुळे प्रशासनाच्या खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी, महसुलातील तूट भरून काढण्यासाठी प्रवासी संख्या वाढवून महसुलात आणखी वाढ करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ